भिजून जाव्या
जश्या पाऊलखुणा
निघून जावे
मेघ तसेही
चार थेंबा विना
दिवसही यावा
निघून जावा
उजेड झाल्यविना
संपून जावा
प्रवास दीर्घ तो
कुणा सोबतीविना
कोरडे वाह्वे
गाल आसवांचे
कुणी पुसल्याविना
संपून जावी
मैफील जीवनाची
दाद मिळाल्यावीना
पहाट वाहवी
अंधार संपुनी
सुंदर स्वप्नावीना
-मैत्रेय
श्रीकांत आफळे
shrikant maitreya shrikantmaitreya@gmail.com

No comments:
Post a Comment