बरोबर चाळीस वर्षे झाली...पुण्यात आलो..आधी तरुण भारत (नरकेसरी प्रकाशन, नागपूर) ,मग १४ वर्षं..वनवास उपभोगला तो इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे शाखेत काम करून...नंतर साली लाईनच बदलली..चक्क वृत्त संपादक म्हणून ई-सकाळचा दहा वर्ष ओळखला जाऊ लागलो..
सातारा सोडून पुण्यात आलो..केवळ योगायोगाने नाकरीला लागलो...आज सातारा येथे काही नाही..आहे त्या जुन्या आठवणी..जुने मित्र..जुनी शाळा..पण योग्य संस्कार...
पुण्यात कधी येऊ अशी स्वप्नातही न वाटणारी गोष्ट होती..पण आधार दिला तो सारस बागेने...नारद मंदिराने..भरत नाट्य मंदिराने..आणि वनाज जवळच्या कुंबरे चाळीतल्या दोन खोल्यांनी..
पुढे जग बदलले...बाय़को आयुष्यात आली..ती ही बॅंकेतली..मग सारा परिवर्तनाचा काळ सुरु झाला तो आजही कायम आहे..
सकाळने मला वयाच्या ५५ व्या वर्षी आपली इथे गरज नाही..म्हणून बजावले..त्यादिवशी राजिनामा दिला...आणि स्वतंत्रपणे वाट शोधू लागलो..
नव्या संस्थांनी बळ दिले..नवे लेखन होऊ लागले..आयुष्यात नवे पर्व आले...
आता मी मोकळा आहे..खिशाने
पण माणसांच्या जगात विहरतो आहे
आनंदाची लहर मिरवत
ती इतरांमध्ये परसवत
समाधानात रमलो आहे..
माणसांचे, मित्रांचे, नात्यांचे बंध
काही तुटले काही बांधले गेले
तर काही आयुष्याशी जोडले गेले
रोज सारे काही नव्याने घडल्यासारखे
सांस्कृतिक क्षेत्राचा धांडोळा घेत
कलेच्या वाटेने धग घेत
मस्तीत , मौजेत
इतरांसाठी..आपल्या माणसात
सारे काही नसूनही..असल्यासारखा
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
1 comment:
आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा आपण आपल्या मुलांच्या सहवासात आनंदी असतो तेव्हा कष्टात काढलेले आपले दिवस फक्त मनात ठेवावे,ओठावर आणू नये,असे मला वाटते.मुले आणि नातवंडे यांच्या उज्वल भवितव्याची मनोकामना करत आपले उर्वरित आयुष्य सुखप्रद करावे.
अनेक शुभेच्छा
Post a Comment