पुणे ते कन्याकुमारी या ४१ तासाच्या प्रवासाला सुरवात झाली आणि मन पुन्हा एकदा वीस वर्षांने मागे गेले. त्यावेळी मुलगा साडेचार वर्षांचा होता...पण ते दिवस थंडीचे होते. आता मात्र उन्हाळ्याच्या दिवसात मुलीच्या इच्छेनुसार रेल्वेतून प्रवास सुरु झाला.. यावेळी गाडीत तुमचा सबपर्वासी कसा असेल..जागा व्यवस्थित असेल नाही..अनेक प्रश्न आधी मनात येतात...पण गाडी सुरु झाली..
आणि केरळाचे मुळचे..पण सध्या मुंबईंच्या मालाडला गेली चाळीस वर्षं वास्तव्य असलेले वेणुगापाल आपल्या पत्नीसह केरळात लग्नासाठी निघाल्याचे संवादातून उमगले आणि मग काय...मरीठी, हिंदी आणि प्रसंगी इंग्रजीच्या सहाय्याने कन्य़ाकुमारीचा प्रवास सुखावह होणार याची जाणीव झाली आणि मुलीचा आणि पत्नीचा उत्साह वाढला.
रेल्वेच्या प्रवासात रेल्वेतले काही खाऊ नका...असा सल्ला ऐकल्याने घरुन निघताना घेतलेल्या विविध खाण्याच्या पदार्थांचा यथेच्छ पण पोटाला त्रास होणार नाही असा आस्वाद घेत..
गाडी धावत होती..आमची खाऊगिरी सुरु होती..सोबत केरळवासिय मुंबईंच्या रेल्वेत नोकरी करणा-या सौ. सुषमा यांनी आणलेल्या इडली चटणीचा नमुना घेता घेता...सुसंवादातून त्यांना मराठी चांगले येते हे ही उमजल्याने आनंदाचे वेगळे दालनच उगडले गेले.
खरचं कुणाच्या चेह-यावरुन जाऊ नये...त्यांच्याशी बोलताना सारे उलगडत जाते..तसेच काहीसे या प्रवासाच्या सुरवातीला वाटले.
वेगाने धावणारी रेल्वे..मधुनच एखादे ठिकाणी उगीचच लुडबुडणा-या मुलासारखी थांबत होती..आपल्याला हे सारे नवे..पण त्या चालकाला हे सारे नित्याचेच..नाही काय...आपण तरी काय करु शकतो..चिडण्याशिवाय..मग होतो मनस्ताप...पण तरीही गाडी धावत असते..आपले मुक्कामाचे थांबे घेत..आणि थांबे तरी किती पुणे ते कन्याकुमारीच्या प्रवासात अवघे ५६ ..होय..
ही गाडी जयंती एक्प्रेस इवढ्या ठिकाणी थांबून आपला शेवटाचा थांबा घेणार..किती कंटाळवाणा..पण तरीही वाटेत येणारे उतरणारे प्रवासी..त्यांची भाषा..मुलांची गंमत..फेरीवाले.पाणीवाले..आणि नाष्टा देणारे..सा-यांच्या नादात गाडी धावत असते..आपण मात्र एका जागी खिळल्याजागी बसून असतो..
आता हे पहा ना..हे भट..ठाण्याचे सेवाव्रती म्हणून आपली सहा महिन्याची सेवा करण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या कन्याकुमारीच्या पसा-यात आपला सहभाग सेवेतून देण्यासाठी निघाले आहेत..गाडीत..सकाळी आसन करुन थोडी ध्यान धारणाही ते करताहेत..
यांनी वयाच्या ७० व्या वर्षी आपला सारा व्यवसाय सोडून कन्याकुमारीच्या या केंद्रात सेवाव्रती बनून काम करायचा निश्चय केला..ते तिकडेच चाललेत जिक़ेडे आम्ही निघालो होतो...
एक तरी सहप्रवाशी शेवटपर्यंत आमच्या सोबत असणार आहे..आणि खरचं अगदी केंद्रातही एकाच गाडीत शेअर करुन निघालो.. सहप्रवासाचा आनंद घेतला.
आंध्र, कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळ हे महाराष्ट्रासह सारे प्रांत ओलांडून भाषेचे रंग मिसळत ही गाडी धावतअसते..मात्र जेव्हा केरळ येतो..
तेव्हा मात्र बाजुच्या वातावणातले बदल
अगदी उन्हाळा असुनही मनात भरत रहातात..
इथली ही गर्दी नसलेली पण अगदी लवकर येणारी स्थानक अनुभवली की मनात वाटते...किती छान...आपल्याकडे हे सारे का नाही.. |
अशी विविध रुपे पहात..विविध धर्माचे लोक..त्यांची धार्मिक स्थळे पहातच सारा प्रवास खिडकिच्या त्या काचेतून अनुभवत गाडीचा वेग..सुरुच असतो..
वाटेत कित्येक प्रकाशचित्रे टिपली तेही मोबाईलमधूनच..अगदी उन्हाळ्यात आपण चाललो आहोत..हे एकतर जाणवले नाही ते वातानुकूलीत डब्यामुळे आणि भोवतालच्या हिरवाईन नटलेल्या निसर्गामुळे..
अखेरीस शिणलेल्या शरीराला दिलास मिळतो..त्रिवेंद्रम गेल्यानंतर आता कन्याकुमारीत काही तासात पोहोचणार याचा..केवळ तिन प्लॅटफॉर्म असलेल्य़ा स्थानकात तसे काही वेगळे नाही..ही सारी बाहेरची भव्यता आहे..
जेव्हा बाहेर येतो..तेव्हा हे कन्याकुमारी स्थानकाचे दृष्य मनात भरते..जाणिव होते की वेगळ्या अशा भव्यतेच्या मंदीराच्या साक्षीदाराच्या रुपाचे दर्शन इथे होणार..
बरोबर असलेल्या प्रकाशजींच्या अनुभवी रुपाने हक्काचा हा माणूस आणि खास शिबीरासाठी आलेला औरंगाबादचा प्रा. हसे..
आम्ही सारेच विवेकानंदपुरमच्या त्या १०० एकरावर उभारलेल्या परिसरात दाखल होतो..आणि हेच ते च्यासाठी गेले काही दिवस सतत हाच विषय मनात घोळवित..स्वप्ने पहात होतो..तेच हे ठिकाण.
मातृमंदिरातल्या खोलीत आमची सोय झाली..आता आम्ही सहा दिवस कन्याकुमारीच्या या केंद्रातल्या याच ठिकाणी रहाणार..मग विश्रांती घेऊन..पुन्हा एकदा तिच स्मृती मनात वावरत फिरायला बाहेर पडलो.
आता नव्याने काही वर्षापूर्वी उभारलेली ही ज्यांनी विवेकानंद स्मारक
उभे केले त्या एकनाथजी रानडे यांच्या समाधीचे हे चित्र..मागे
विवेकानंदाचा पूर्णाकृती पुतळा..आणि मागे समुद्राचा विस्तिर्ण अवतार
परिसरात फिरताना
जागोजागी मोर दिसतात..मनसोक्त फिरताना..तुम्हीही त्यांना सहजी पाहू शकतो..कुठलाही
पिंजरा नाही..आडकाठी नाही..
त्यांना दाणा-पाणी मिळावे यासाठी एक जीवनव्रती संन्यासी व्यक्ति त्यांच्यासाठी ही सारी कामे करतात..अगदी आनंदाने..मोरही इतके तयार झाले आहेत की ,
त्यांनी अन्न दिल्यानंतर एखाद्याला मिळाले नाही तर तो त्यांच्या मागे धावतो..तेही त्यांच्या त्या झोळीवजा पिशवीतून ज्वारी-तांदूळ टाकतात... आपण या परिसरात कुठेही असा मोरांचे आवाज तुमच्यापर्य़त सहजपणे पडतात..ते धावत असतात..इथे ११० मोर आहे. या प्रचंड अशा परिसरावर ..या निसर्गरम्य वातावरणातला तेही एक मगत्वाचा हिस्सा बनले आहेत.
इथे एका वेळी १००० लोक वास्तव्य करु शकतील अशी सोय आहे..त्यासाठी केंद्राचे काम वेगळे आणि यासाठी व्यावसायिक सारखे काम करणारे कार्यालय वेगळे..त्यांचेसाठी स्वतंत्र जेवणाची सोय़ उपलब्ध आहे...
दिवसा तर प्रवासी येतातच पण केव्हाही रात्री इथे गाड्या घेऊन पर्यटक येत असाता..त्यांचेसाठी चाविस तास सेवा देण्याची सोय आहे.
कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात अनेक लोक स्वेच्छेने काम करतात..काही कायमचे तिथल्या कामात आपले योगदान देतात..तर काही काही महिने...तुम्हीही तुमचा वेळ देऊन विवेकानंद यांच्या कार्याचा मंत्र पोहचविण्याचे काम करतात..
जीवनव्रती, सेवाव्रती....अशा काही कामाचे स्वरुप असते..सेवा भाव..हवा..मनात स्नेहभाव..
यातले पहिले आहेत ते मामाजी म्हणून तिथे ओळखले जातात..
त्यांच्या सोबत आहेत..ते प्रकाशजी भट..ते मुंबईतले..सारा व्यवसाय सोडून वयाच्या ७३ व्या वर्षी ते सेवा करण्यासाठी सहा महिने , तिन महिने तिथल्या कामाची जबाबदारी सांभाळतात.
दुसरे आहेत...देशात पसरलेल्या सुमारे २०० केंद्रांचे हिशेब पहाणारे नाशिकचे नंदन कुलकर्णी..ते २००८ पासून इथे जीवनव्रती बनून कारभार पाहतात..
जीवनव्रती, सेवाव्रती....अशा
काही कामाचे स्वरुप असते..सेवा भाव..हवा..मनात स्नेहभाव..
यातले पहिले आहेत ते मामाजी म्हणून तिथे ओळखले जातात
यातले पहिले आहेत ते मामाजी म्हणून तिथे ओळखले जातात
कोवल्लमचे...ते गंगोत्री या एकनाथजी रानडे यांच्या
प्रदर्शनाचा कार्यभार सांभाळतात..
सेवा..त्याग आणि समर्पण..हेच आयुष्याचे धेय्य् बनून रहाणारे अनेक जण आहेत.
सेवा..त्याग आणि समर्पण..हेच आयुष्याचे धेय्य् बनून रहाणारे अनेक जण आहेत.
दोन दिवस पावसाचे
वातावरण..मधुनच असा कताही धो धो पाऊस कोसळायचा की विचारु नका..मग सारे शांत
व्हायचे.. पण त्याआधी मोरांचे ओऱडणे एकू यायचे..हवेत उकाडा तीव्र वाढायचा आमि
अचानक ढग काळे होऊन पावसाचे थैमान सुरु व्हायचे..उन्हाळ्यातली धग आणि उकाडा सारेच
एकदम भासू लागले..
तशातही तिथल्या कन्याकुमारी मंदीराच्या परिसरातल्य़ा प्रदर्शनाला
भेट दिली..स्वामी विवेकानंदांनी भारतभ्रमण करताना कुठे भेट दिली याचा इतिहासतच इथे
दाखविला
आहे..अगदी सचित्र.
आहे..अगदी सचित्र.
परिसरातल्या ठराविक इमारती साध्या आमि सहजपणे सर्वांच्या खिशाला परवडणा-या आहेत मात्र पंचमहाभूतांचे नावे टाकून
बांधलेल्या मोठ्या बंगलीत वातानुकुलित सेवा देऊन..त्यांचे भाडेही जादा आहे..
मात्र तो परिसरही तेवढाच सुशोभित केला आहे..
त्याभोवतालीचे वातावरणही तसेच सुरेख तयार केले आहे..जल, वायू, आकाश,पृथ्वी...अशी त्यांची नावे आहेत.
खरेच सारा परिसरही भुरळ घालणारा आहे..याचे सारे बुकींग अॉनलाईन होते..अगदी मेलवर देखील..स्वामी विवेकांनंदांच्या नावाने उभारलेल्या परिसरात राहून कन्याकुमारी मातेचे दर्शन घ्यायलाच हवे..तसा तिथला शंख, नारळ आणि शिंपल्यापासून तयार केलेल्या वस्तुचा बाजार सर्वांनाच मोह घालतो.
पावसाच्या वातावरणात असून समुद्राच्या एका दग़डावर उभारलेल्या भव्य स्मारकावर पोहोचतानाही पावसाची धास्ती वाटत होती..पण केंद्रातून सतत तिकडे जाणारी विनामूल्य फिरती सेवा..असल्याने आता स्मारकाचे ते दिव्यत्व पहायला सारेच आतूर झालो होतो..त्याचा हा प्रकाशचित्रमय आविष्कार..
ओंकाराच्या समोर बसून ध्यान करण्यात जो आनंद मनाला मिळतो तो काही सागंता येत नाही. स्वामि विवेकानंदानी केलेल्या त्या महान कार्याची आठवण झाल्याशिवाय नक्कीच रहात नाही. |
एक दिवस मोकळा वेळ मिळाला तेवढ्यात त्रिवेंद्रमला जाऊन आलो..तिथे पदमनाभ
मंदिरातल्या देवाचे दर्शन घेतले..तिथेही पावसाने आमचा पिच्छा सोडला नाही..वस मोकळा वेळ मिळाला तेवढ्यात त्रिवेंद्रमला जाऊन आलो..तिथे पदमनाभ
मंदिरातल्या देवाचे दर्शन घेतले..तिथेही पावसाने आमचा पिच्छा सोडला नाही..
तेवढ्या वेळात
कोवल्लम बीचवर गेलो..निळ्या शांत सागरातल्या लाटांच्या सहवासात काही काळ निसर्गाचा
अनुभव घेतला पावसाने मधुमच आम्हीला भिजविले..पण त्याची पर्वा न करता..त्रिंवेद्रमच्या
त्या वातानुकूलित सिटीमध्ये बसून बीचवरुन मंदिराजवळच्या मध्यवर्ती परिसरात येऊन
पोहोचलो..तिथून रेल्वेने पुन्हा
कन्याकुमारीत मुक्कामाला हजर.
याच वातावरणात मुलीने सांगितले मी काही मंदीर पहाण्यासाठी आले नाही...तुम्हाला जायचे तर जा..म्हणून आम्ही उभयता चक्क तामिळनाडू सरकारच्या बसने सुचिंद्रमला गेलो..
मारुतीची मूर्ती..आणि ते भव्य मंदिर पाहिले..त्याच दिवशी तिथे रथाचे आयोजन केले होते..ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्तींच्या प्रतिमा त्यात ठेऊन..गावातून मिरविणार होते..तेही दृष्य पाहाण्यासारखे होते.
पुढे नागरकोविल
शहरातल्या नागराज मंदिरात गेलो..तिथे सारीकडे नागांची प्रतिके..
मंदिर पुरातन आणि
त्यागावाचे नाव सार्थ करणारे आहे..तिथे बाहेरच एका मोठ्या चबुत-यावर नागांच्या
प्रतिमांचे दगडांचे कोरीव काम दिसते..
सारीकडे भक्तांचा उल्हास प्रत्येक क्षणि भासत
होता..
त्यातच पावसाने जबरदस्त
हजेरी लावली..
मंदिराच्या बाहेरच्या पडवीत बसून कोसळणारा तो पाऊस पाहताना वेगळाच
आनंद मनातून ओसंडत होता.
उद्या उभारल्या जाणा-या स्वतंत्रतेदेवतेच्या आणि २७ फूटी
ग्रनाईटच्या हनुमान मंदिराचे आणि त्यात तयार होणा-या रामायणातल्या प्रसंगाचे दर्शन
घडविणारे काम सुरू आहे..
|
No comments:
Post a Comment