
आज सकाळपासूनच स्वातंत्रयदिनाची हलचल रस्ता नोंदवित होता.
सर्व सुखाचे आणि दुःखाचे क्षण हात रस्ता आदी सांगतो. नाही का?
शाळेत जाणारी छोटी बच्चे कंपनी १५ ऑगस्टच्या झेंडावंदन दिनाला लगबगीने रस्ता आडवून वेगवेगळ्या मुडमध्ये धावत होती.
आज लाखो नागरिक विश्रांतीचा रविवार सुखनैव घालविण्यासाठी जेव्हा साखरझेपेच असतील तेव्हा या मुलांच्या घरी आवरून शाळेत निघायची घाई झालेली असेल.
त्यांचे ते निरागसपण अनुभवले की उद्याची ही मोठी नागरी फळी यांना शिक्षकांबद्दल प्रेम आहे. शाळेबद्दल आस्था आहे.
आज्ञा पालन करणे हे तर त्यांचे कर्तव्यच आहे.
त्यांच्याकडून देशाला खरीच आशा आहे.
शाळेतही सारेच उत्साही वातावरण.
देशाचा हा सण साजरा करण्यासाठी . उद्याची महान देशाची उंची वाढविण्यासाठी ही पिढी घडविणारी सारीच शिक्षक मंडळी इथे आपापल्या वर्गाची जबाबदारी घेउन मुलांवर थोडी शिस्त लावताना दिसत होती.
यात काही प्रमाणात कामाचा भागही असेलही. पण या कामातला आनंद घेउनही ही मंडळी धावाधाव करताना पाहिले की बरे वाटते.
ध्वज उंचावताना उत्साहाने राष्ट्रगीत म्हणणारे ते आवाज आणि संचलनात सामिल झालेल्या घोष पथकातून वाजत जाणारी राष्ट्रभक्तिची धून सारेच आनंदीत.
शाळा हीच उद्याची पिढी घडविणारी मोठी प्रयोगशाळा आहे. हे आज पुन्हा पुन्हा सिध्द होते आहे.
आपणही या सा-यांना मदत करू या. आळसाने झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करण्यापेक्षा जी जागी आहेत त्यांना सशक्त बनविण्यासाठी थोडा वेळ कारणी लावला तरी यात सार कांही आले.
डोळ्याला देसले ते तिरंगी निशाण
वाकून प्रणाम करी
हाच नाही का देशाचा अभिमान
सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmnail.com
9552596276
No comments:
Post a Comment