नाही मुखाचे दर्शन
नाही सुखाचे हे क्षण
उसळले माझे मन
धाव घेई
किती हा दुरावा
हवा थोडा तो ओलावा
क्षणभरी तरी नको
सहवास भेटावा
असा रुसवा नसावा
अंती सुखाचा शिडकावा
मन तळमळे इथे
काळीजही उडे
वारा वाहे बाहेरी
अंतरी धग दाटे तीही
सोडू नकोस आता ग
पुसावाही नाही
आठवांना आठविता काळ संपता संपेना
साठविल्या जाणिवाही पुरणार नाही
भेटल्यावाचूनी आता मी थांबणार नाही
दाट धुक्यात चालतो
धग जवळी हवी ग
पावले पावलांवरी
टाकाया हवी ग
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment