वेडे व्हा. वेडे व्हा आपल्या इतिहासाकरीता आपण वेडे व्हा.खूप आहे मौलिक आहे. ते शोधायला शिका, हा बाबासाहेब पुरंदरेच्याच्या वाणीतून ऐकलेला संदेश अनुभवला आणि तुम्हालाही तो ऐकताना पटेल...
छत्रपतीं शिवाजी महाराजांची आर्ट गॅलरी सुरू करावी आणि १५९० ते १७३० या कालावधीतले शिवाजी महाराजां विषयीच्या इतिहासाचा तपशिल सांगणारी लायब्ररी काढणे हे दोन संकल्प वयाच्या ८९व्या वर्षी ज्या आत्मविश्र्वासाने शिवशाहिर बाबासाहेव पुरंदरे यांनी मांडले. ते ऐकतानाही त्यांचे हे दोन्ही उपक्रम नक्कीच पूर्ण होतील याची खात्री वाटते.
तन, मन दिले की धन आपोआपच गोळा होते त्याकरता कुठे जायची गरज नाही. ते तुमच्याकडून न मागता मिळते हा अनुभव बाबासाहेब विषद करतात.
पुण्यात शिवशाहिरांना लोकमान्य मातृभूमी पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला. पाच लाख ५१ हजारांचा पुरस्कार मंगळवारी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात भव्य समारंभात माजी पोलिस महासंचालक अरविंद इनांमदार यांच्या हस्ते देण्याच्या कार्यक्रमातले भाषण शिवशाहिरांच्या कृतिशिल व्यक्तित्वाचे द्रर्शन घडविणारे होते.
आपल्या कारकीर्दीत कुणासमोर न झुकलेल्या अरविंद इनामदारांनी शिवशाहिरांना केलेला सॅल्यूट पहाणे हाही एक मानाचा क्षण होता.
शिवचरित्राची बाराहजारावर व्याख्याने आणि जाणता राजा या महानाट्यातून छत्रपतींची कारकीर्द मांडणारे बाबासाहेव पुरंदरे यांच्याविषयीची कृतज्ञता कार्यक्रमातल्या प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यातून जाणवत होती.
यानिमित्ताने ८९व्या वर्षीही चैतन्य म्हणजे काय याचा प्रत्यय घेतला. दाजीकाका गाडगाळांचे उदाहरण देउन ते ९२व्या वर्षी कसे आहेत तसे मला आणखी पाच वर्ष धडधाकट ठेवण्याचे बाबासाहेब देवाकडे मागणे मागतात. तोही क्षण अनुभवण्यासारखा होता. ते आयुष्य मागतात. ते छत्रपतींचे चरित्र वविध अंगाने पूर्ण करण्यासाठी.
धेय्य एकच. वेड एकच. ध्यास एकच.
त्यांना उद्याच्या पिढीविषयीची आस्था आहे. ते म्हणतात,'काय सांगावे. त्यात बाजी, तानाजी इतकेच नव्हे उद्याचा शिवाजीही जन्माला आला असेल. तुम्ही त्याला चांगले संस्कार द्या'.
असे समारंभ इतिहास शिकवितात. प्रेरणा देतात आणि स्फूर्तिही देतात.
जय हिंद. जय महाराष्ट्र, जय शिवाजी.
सुभाष इनामदार,पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment