Wednesday, March 14, 2012

पिंपळपान...जाळी झालेले एक पान सहज वहीत गवसले
जणू जुन्या स्मृतींना देत त्या आठवणी साठवित पहुडले

किती दिवस झाले आता निटसे आठवत नाही
किती स्वप्ने गळून गेली आता ती उगाळायची नाही

वाट पाहुन थकलेले पाय कधीचेच थांबलेले
आता नव्या स्वप्नांच्या धुंदीत तेही विसावलेले

उरी चेतल्या , जागल्या त्या आठवांच्या नोंदी
किती आणा, शपथा ती होती एक धुंदी

नाही साहवेना आता जुनी झाली गाठोडी
चेतावली त्यात आता अंधुकशी चिंधोटी

सारी कधी स्वप्ने पुरी होत असतात का ?
तरीही कुणी ती पाहायची सोडतात का ?

गेली वर्षे आणि महिने गेला तो काळ
पिंपळाची जीर्ण पाने सुकलाही तो बाळ

नांदती सुखी आता दोन जीव दोही दिशी
उरलेल्या आयुष्याच्या गाठी आली आता एकादशी....
सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


No comments: