Tuesday, May 21, 2013

विनया देसाई-फुलं गोवणारा धागासौ. विनया देसाई..गेली २५ वर्षे त्या शब्दांचे पूल बांधतात..त्यावरुन रसिक आणि गायक, वादक, साहित्यिक सहजपणे कार्यक्रमाला सामोरा जातो. ही शब्दांची किमया अभ्यासपूर्ण रित्या त्यांनी जोपासली..आणि आपल्य़ाच सोप्या, साध्या आणि सात्वीक शैलीत त्यांनी आकार दिला...


तसे प्रत्येक क्षेत्र तुमची परिक्षा घेणारे..तरीही हे अधिक ..चोखंदळ आणि संवेदनाशील..
इथे काही काळ तुमची स्त्वपरिक्षा असते...ती रसिकांसमोर..ती जिंकलात तर टाळ्या..निराश केले तर मात्र तिटकारा...
भाषेकडे लक्ष. संर्दभाची जाण.. मागच्या गीताची गेलेली आठवण साठवत पुढील दृष्यात्मक  भागाकडे आकर्षीले जाईल असे..भाष्य....त्यात प्रत्येकाची नावे यथायोग्य सांगायची जबाबदारी...एकूणच निवेदक वा सूत्रसंचालकांचा दबावही असतो आणि दाबही..
एका लेखात त्या लिहितात...
समोरच्या रसिक प्रेक्षकांना आनंद देण्याचा हा सोहळा मी अनेकदा अनुभवलाय. सरीवर सरी बरसल्या अशा गाण्यांची  मैफल असो किंवा मोगरीच्या फुलांप्रमाणे उमललेली ताजी टवटवीत जुनी भावगीतं असो..त्यात निवेदनाने रंग भरला. फुलं ओवायला धागा हवा तसं गाण्यांची फुलं गोवणारा धागा झाले. ...सूत्रसंचालनातला आनंद तर शब्दात न मावणारा. प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या नात्यानी किती दिग्गज भेटले..याची गणतीच नाही..एकूणच या क्षेत्रात कोट्यावधी हशें आणि तेवढ्याच कानात साठवाव्यात एवढ्या टाळ्या मिळविले..ते काम स्वतःसाठी नाही ते त्या सादरकर्त्य़ा कलावंतांसाठी..साथीदारांसाटी..साहित्यिकांसाठी..

मूक-बधीर अशा मुलांच्या ज्ञातात विज्ञान रुजविण्याची कामगिरी..बीएससी नंतर निवडली..याही क्षेत्रात शब्दावीना संवाद करायची जादू उमटवली .त्या क्षेत्रातली त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

केवळ शब्दांनी कार्यक्रमाची बहारदारता वाढविली असे नाही..तर साहित्य वाचता वाचता स्वतःही साहित्यिक बनल्या...त्यांच्या नावावर आठ पुस्तकांच्या नोंदी आहेत. तशा मितभाषी असल्या तरी मनातून सतत बोलत असतात..घर-संसार-शाळा आणि उरलेल्या वेळात निवेदनाची जबाबदारी पेलताना घरच्यांचं तेवढेच मोलाचं पाठबळ उभे आहे...त्या सा-यांना याचा अभिमान आहे...आम्हालाही आहे..हे सारे करताना स्वतःमधला कलावंत जागविला.. अनुभवांचे संचित ``आनंदयात्री` या एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने त्यांनाच अर्पण केले.. आज त्याचेही चारशेच्यावर कार्यक्रम झालेत.
२२ मे २०१३ ला संध्याकाळी त्यांच्या या कर्तृत्वाचा जागर होणार आहे... देताना जे दिले..त्यातले कांही अनेकांच्या उपस्थितीत पुढे दिसणार आहे...
आज आपण सारे या निवेदन क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलेला सलाम करुया...हिच उमेद..हेच संचित घेऊन..अखेरपर्य़ंत आयुष्याच्या मैफलीत अनेक धागे गुंतवित..त्यातला एक धागा आपणही आळवूया...
जमविलेले सारे
आज डोळ्यासमोर दिसते आहे
घडलेल्या सा-या क्षणांचे
चित्र स्पष्ट उमटले आहे
संवादाने साधलेली किमया
आज पुढे ठाकली आहे
विनयाने..अभिमानाने
वाटचाल तर पुढेच करायची आहे..
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
95525926726No comments: