Wednesday, January 22, 2014

अरूण भट आणि अनुभव..तृप्ततेचा

खरच सांगतो मी रविवारी हुबळीतून पुण्यात परतलो..पण माझे मन मी शिरसीतल्या अरुण भट यांच्या जंगलमय वातावरणातील हिरव्या जगातल्या त्या मुक्त परिसरात हरवून आलो आहे.

रविवार ते शनिवार असा हा उलट्या वारांचा तिथला अनुभव  केवळ शब्दातीत आहे..खरं म्हणजे स्वर्ग पाहिलेला माणूस आहे मी असे म्हटले तर ते वावगं ठरणार नाही..इतका शांत..तरीही सर्व सोयींनी युक्त..निसर्गात रहाणे म्हणजे काय..त्याला जर आपल्याला हवे तसे सौंदर्यपूर्ण बनविले तर तोही तुमच्या जवळ कसा येतो..ते मला कळून आले..खरं तर मी पुन्हा तिथे केवळ निवांतपणा अनुभवण्यासाठी पुन्हा जाणार आहे.

खरं तर कुठल्याही टुरचा मालक आपले स्वागत करायला येतो, ही कल्पनाच नव्हती..पण इथे प्रत्यक्ष अरुण भटांचे दर्शन झाले ते हुबळीतल्या स्वातीमध्ये..इतका साधा..तसा भोंगळ वाटावा असा...पण तेवढाच फणसारखा भासणारा धिप्पाड  पण आतून पाहुणचाराने डबडलेला हा ७० वर्षांचा उत्साही गृहस्थ..
मुळात म्हणजे आपल्याबरोबर बसून स्वतः प्रत्येकाचा आस्वाद घेणारा हा खाण्यावर आणि खाणा-यांवर मनापासून लुप्त असलेले हे व्यक्तिमत्व.

आम्ही १३ जणांचा ५१ ते ८१ अशा वयोगटाचा आमचा ग्रुप. जेव्हा अरूण भट आपल्या शेलीत खुमासदारपणे सांगतात तेव्हा ते सा-यांनाच आवडत..कारण आम्ही थोड्या मागच्या पिढीचे...आणि भट आमच्या पिढीचे...`

तसा मी मुंबईचा. प्रभादेवीत रहातो..पण मोठ्या शहरात छोटा होऊन रहाण्यापेक्षा आपल्या छोट्या गावात मोठा माणूस होऊन रहाणे पसंत केले आणि त्यांनी ९५ साली शिरसीतली १५ एकरची ही जागा घेतली. अडीच वर्षात सारे बांधकाम पुरे झाले आणि रिसॉर्टला पाहुण्याचे लागले.`

आता मात्र ते अधिकाधिक काळ शिरसीतल्या या निसर्गरम्य जागेत रहातात. पत्नी मुंबईतले कार्यालय पहाते. मुलाने स्वताःहाची परदेशी टूर कंपनी अनुभव हॉलिडेज ..काढली..

एक मात्र छान की त्यांची मुलगी प्राची आपला पती अनिरुध्द शेटये सोबत सारा कारभार..
विशेषतः पाहुण्यांचे पोटभर स्वागत करते..
शिरसीतल्या या जंगलातील खोल्या म्हणजे जणू.. सुविधाजनक सोयी देणारे उत्तम रहाण्याचे ठिकाण...

परिसरातल्या पहिल्या दर्शनाने मन आनंदून जाते..बाहेरही सुंदरशा फरशा लावून हिरवळ खेळविली आहे. बंगल्याप्रमाणे रुबाबदार वाचावे असे ऐटबाज जीवन इथे सुखावते. केवळ परिसर नव्हे


 तर अगदी राम पटकुरेंपासून..खरतर ते हिशेबविभाग सांभाळतात...पण वेळेप्रमाणे पाहुण्यांच्या दिमतील हजर असतात.

किरण, सुनिल , सुशील आणि शक्ति राणा पर्यंत सारेच तुमची काळजी घेतात..सकाळच्या चहापासून रात्रीच्या आइस्क्रिमपर्यंत...पाहुणचार असावा तर असा..आता पुरे...नको.नको...बास ..असे म्हणण्याची पाळी येते...


इथला मंत्र म्हणजे...रोज रात्री सुखाने निरव शांततेत झोप काढा. सकाळी उठून निसर्गसफारी मनसोक्त करा...भरपेट नाष्टा घ्या..तोही रोज वेगवेगळ्या पदार्तांचा..थोडे आजुबाजुच्या परिसरातील निसर्गरम्य जग बघा.
आणि पुन्हा दुपारी यथेच्छ..भोजनाचा आस्वाद घ्या...दुपारी चहानंतर पुन्हा एक मीनी सफर मारा..खरेदी करा...रात्रीच्या जेवण्यास परत त्यांच्या त्या उत्तम त-हेने सुबक सजविलेल्या दालनात या...रोज ताजी फळं आणि पुन्हा वर आईस्क्रिमचा मारा...

 शिरसीतल्या नावाजलेल्या श्रीधर हेगडे यांचे गायन..ऐकताना त्यांची मेहनत आणि त्यांचे मराठीतले अभंग ऐकताना मन तृप्त होते..
मुळात त्याआधी स्वतः अरुण भट जे निवेदन करतात..तेही तेवढेच परिपूर्ण...मात्र ते ऐकण्याचे भाग्य लाभायला एखादा सहप्रवासी मिठाचा खडा टाकणार नाही..हे पहावे लागते..

अनुभवच्या सहली करताना जो काही ठरलेला कार्यक्रम असतो तो तर पार पडतोच..पण त्याशिवाय जर भट स्वतः तुमच्या गाडीत असतील तर मग काय. महलांना गजरे काय..खायला काय...आणि त्यांच्या मनातले भाव काय. सारेच ऐकता येतात..


मनाप्रमाणे हिंडलो
बागडलो
रोजच्या कामात बदल
विरंगुळा
निसर्ग अनुभवला
फिरलो
ताजेतवाने झालो
चाललो
किती वेगळा आनंद
समाधान

जे उतरले चेह-यावर
तळहातांवर
सहप्रवाशांची साथ
जोड
सारेच वेगळे
बोलके
पुन्हा तोच आनंद
हासरा
घेऊन निघायचे पुढच्या प्रवासाला...


शिरसीतल्या अनुबवानंतर मी तर पुरता भट सरांच्या नव्हे भट काकांच्या पुरत्या प्रेमातच पडलो आहे. त्यांनी जी आनंदी वृत्तीने आमची आठ दिवसांची ही चैन मनसोक्त रित्या आमच्या मनात कायमची घर करुन ठेवली..त्याला खरचं तोड नाही..याचा दुसराही अर्थ असा होतो की त्यांच्या बोलण्यावर , अदाकारीवर आणि सहवासावर आम्ही लट्टू झालो आहोत. जुलै, अॉगस्ट आणि गणपतीतले आठ दिवस सोडले तर इथे वर्षभर सतत माणसांचा वावर असतो...

हे सरे मी लिहले ती यांची जाहिरात व्हावी म्हणून नाही...तर डिस्कव्हर कर्नाटकाचा अनुभव घेताना मला हे सारे तुम्हाला सांगितल्यावाचून रहावेना..मी पुरता त्यात डूंबून गेलो आहे..कदाचित तो माझा वीकपॉईंटही असेल पण ते तुम्हाला सांगावेसे वाटते... 

 शिरसीतल्या विविध दिशेला रोड फिरायचे..

आज कुठे धर्मा जलाशय.
तिथून शिवगंगा फॉलकडे जायचे...वाटेत दिसणारा नुमुळता रस्ता आणि सभोवतालची हिरवीगार वनराई अनुभवायची..
मंडगुडची तिबेटी मॉनेस्ट्री तृप्त होऊन गाडीतच कोकम सरबत आणि खास धारवाडी करदंड खायचा खास पाहुणचार घेऊन..पुन्हा भोजनाच्या आग्रहाचा स्विकार करायचा..


रोज नवी दिशा ..नवा निसर्ग पहाून समाधान पावणारे आम्ही सारे..अरुण भटांच्या दिलदारपणाचे गोडवे गात..बाहेर पडायचो..पुन्हा पुन्हा इते येण्याचे ठरवूनच..

रॉक गार्डन हुबळी
आज दौरा होता..तो हुबळीजवळच्या रॉक फेस्टीव्हच्या गर्दीत स्वतःला हरखून जायचा.. इथे उत्तर कर्नाटकातली ती विरून गेलेली सारी संस्कृती पुन्हा जीवंत होउन दिसत होती.

 

मिरजान फोर्ट...हा कर्नाटक आणि मराठी राजांनी आपल्या अस्तकित्वाने टिकून ठेवलेला अघनाशिनी नदीच्या पाण्यातून व्यापार करण्यासाठी उभारलेला किल्ला ...आज केवळ अवशेष आहे..पण दूरदृष्टीचा इते स्पर्श होतो हे नक्की..


समुद्रकीनारा ..आणि  प्रचंड अशा नदीतल्या मार्वीन कुर्वे बंदरावरेचे बोटींग..
अप्सरा कुंडा ..म्हणजे इथे अस्परा स्नानासाठी येत असलेला धबधबा.आणि असन कोंडा ..हा सूर्यास्ताची मजा पाहण्यासाठी समुद्रात उतरेला सूर्य..

अखेरच्या टप्प्यावर येताना...बोलका झालेला..डोळ्यांचे पारणे फेडणारा सावेडी फॉल....अवघड अशा वाटेवरून डोंगराच्या उंचीवरून काळी नदीच्या उगमस्थानावर असलेला हा प्रचंड खलखळाट करुन वाहणारा हा धबधबा..म्हणजे निसर्गाच्या कुशीतले हे पाण्याचे प्रचंड साठेच..

असा हा अनुभव कित्येकांना आला आसेल..त्यांनी ते आपल्या रुपाने व्रणनही केले असेल..म्हणूनच माझी विनंती आहे की मी फेसबुकवर ..https://www.facebook.com/pages/Anubhav-bandh%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/1397012083887007 Anubhav bandh/अनुभव बंध
असा हा अनुभव कित्येकांना आला आसेल..त्यांनी ते आपल्या रुपाने वर्णनही केले असेल..म्हणूनच माझी विनंती आहे की मी फेसबुकवर ..या नावानं अरुण भटांच्या या सहलीत गेलेल्यांचे अनुभव एकत्र करण्याची मनीषा ठेऊन तयार केलेले पेज आहे..आपणही त्यात लिहावे..यासाठी मी फार उत्सुक आहे...

पुन्हा पुन्हा असे अनुभव घडावेत हेच सांगणे करुन इथेच हा प्रदिर्घ अनुभव लिहिण्यासाठीचा विराम घेतो..

- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdfar@gmail.com
09552596276No comments: