Monday, March 14, 2016

Jugalbandi-nilima radkar and charusheela gosavi

रविवारी १३ मार्च २०१६ ला पुण्यात स्वरबहारच्या वतीने पं. गजाननबुवा जोशी यांच्या १०५व्या जयंती निमित्ताने त्यांचे शिष्य पं. भालचंद्र देव यांनी व्हायोलीन वादनाची मैफल आयोजित केली होती..

यात पं. भालचंद्र देव यांच्यासह सौ. चारुशीला गोसावी, सौ. निलिमा राडकर, रजत नंदनवाडकर, अभय आगाशे या व्हायोलीन वादकांनी आपली कला सादर करुन रसिकांची दाद मिळविली.

यात सौ. चारुशीला गोसावी आणि सौ. निलिमा राडकर यांनी जुगलबंदीत राग भिमपलास सादर केला.

संपूर्ण कार्यक्रमाला तबला संगत केली ती रविराज गोसावी यांनी.
तर निवेदन केले ते राजय गोसावी यांनी..

No comments: