Friday, December 16, 2016

रमेश भिडे यांची स्वगतं..एकदा रसिकांनी अनुभवावीच... प्रत्येक नटाला नटसम्राट होता येत नाही. तो त्या नायकाच्या भोवती किरकोळ कामे करत वावरत असतो..त्याची एंट्री केव्हा होते..केव्हा तो विंगेत जातो. कधी त्या रसिकांना कळतही नाही..पण तो नसला तर नाटक अपुरे रहाते..त्या नटाभोवती ..किंवा नाटकाच्या सभोवताली त्याचे अस्तित्व असते..तो नट असतो..तो त्यांची अभिनयाचा शैली पहातो..अनुभवतो..त्यांच्यासारखे आपणही बनावे यांसारखी स्वप्ने पहात कित्येक वर्ष प्रयोगातून आपली भूमिका पार पडतो..मिळेल ती नाईच स्विकारतो..पुन्हा पुढच्या प्रयोगाकडे वाटचाला त्याची सुरूच असते.

अशा नाटकातून छोट्या भूमिका करून रंगभूमिशी एकरूप झालेले नाव म्हणजे रमेश भिडे..
आता नव्या भूमिकेच्या शोधात नटाला स्वतःचे मार्केटिंग करावे लागते..मिळेल ते काम स्विकारावे लागते..मनाला मुरड घालून पोटासाठी जुळवून घेऊन काम स्विकारावे लागते..थोडक्यात तडजोड करून आपली झोळी भरून घ्यावी लागते..

गेली ४० वर्षे नाट्यसंपदासारख्या संस्थेत नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्यावरोबर अनेक नाटकात छोट्या भूमिका करत नट म्हणून अंधारतल्या विंगेत ते वावरले..तीथून नाटक अनुभवले..कधी तरी आपणही मोठा नट बनू या जिद्दीने भूमिका करत राहिले..पण ते नशीबात नव्हते..म्हणा किंवा या नव्या तडजोडिच्या नव्या जगात त्यांना स्वतःचे अस्तित्व विसरून कामे शोधता आली नाहीत..म्हणून ते घरातच त्या जुन्या आठवणीत स्वतः रंगभूमिवरच्या जुन्या नाटकातली स्वगते घरातच रंगवित आपल्या मनात बंद करून ठेवलेली स्वप्ने प्रत्यक्षात खरी करून पाहू लागले..

घराच्यांनी कित्येक वेळा सांगून पाहिले..बाबा..घर म्हणजे रंगभूमि नाही..तुम्ही आठवणींना कुरवाळत किती काळ बसणार आहात..सांगून पाहिले..

पण मन मरत नाही...जीवाची घालमेल होते..म्हणून ती जुनी स्वगते अंधारातल्या त्या घराच्या चारभिंतीत
साभिनय म्हणू लागले..त्यातच रंगू लागले..वेळेचे..काळाचे भान हरपून ते बनत..कधी विद्यानंद..तर कधी आप्पासाहेब बेलवकर..

प्रसंगी त्यांना सोबत आठवू लागतात ती संगीत नाटकातली पदे..अगदी त्या पात्रांच्या स्वगतांना साजेल अशी..
मग तुम्हीही काही काळ त्यांच्याबरोबर त्यानाटकाच्या दृष्यात एकरूप होऊन जाता..

अंधारातील स्वगते..या तशा एकपात्री कार्यक्रमात नेमके रमेश भिडे हेच करतात..त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या ह्या  प्रवासाचे ते नाटक बनवितात..आणि दीड तासाचे रसिकरंजन करत असतात..
त्यांच्या अभिनयात कस आहे..वाणीत श्रवणीयता आहे..चेह-यावर भाव ऊमटतात..अंगात ती मस्ती आहे..शरीरात बळ आहे..ते पुन्हा पुन्हा ते पात्र रंगमंचावर साकारतात..स्वतःमधला नट पुन्हा जीवंत करतात..तुम्हालाही त्यांत्यासमवेत ते घेऊन जातात..

ही संकल्पना संहिता आणि प्रत्यक्षात अवतरली ती त्यांच्या मुलाने..डॉ. प्रसाद भिडे यांनी....
आपल्या वडीलांची ही तयारी पाहून त्यांनी ही स्वगते अंधारातून प्रकाशाकडे आणली..त्याला अतिशय योग्य असे दोन संगीत नाटकातली पदे रंगविणारे कलावंत अनुराधा केळकर आणि धवल भागवत सोबतीला आणले. आणि नुसत्या शब्दातून रंगणारी ही स्वगते सुरेल केली ती दोघ्यांच्या नाट्यपदातून.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात १० डिसेंबर १६ ला प्रवीण बर्वे यांच्या सहकार्याने झालेल्या या प्रयोगाचा मी अनुभव घेतला..खरं म्हणजे याचे प्रयोग...आता फारशी न होणारी..तरीही नाट्यइतिहासात कोरून ठेवावी अशा नाटकातल्या स्वगतांनी पुन्हा एकदा रसिकांना पहायला आवडेल अशीच आहेत.
ते पाहणारे रसिकही तसेच आजोबाटाईप असले तरी भावना त्याच आहेत..

रंमेश भिडे य़ांना काही काळ पुन्हा त्या नाटकात जगू दिले याबद्दल प्रसादचे कौतूक करावे तेवढे थोडे..
त्यांच्या मते मराठी नाटकातील गाजलेली स्वगतं आणि नाट्यगीतं यांचं हे रिइंटरप्रिटेशन आहे.


अश्रुंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते, एकच प्याला, नटसम्राट, पुण्यप्रभाव या गाजलेल्या नाटकातील काही स्वगतं आणि  मर्मबंधातली ठेव ही, कशी या त्यजु पदाला, देवाघरचे ज्ञात कुणाला, मी मानापमाना, कैवल्याच्या चांदण्याला यासारख्या श्रुतीमधुर नाट्यपदांचा  आनंद या प्रयोगाच्या माध्यमातून रसिकांना घेता येतो.

एकूणच प्रयोगात सुधांशू घारपुरे हे पेटीवर साथ करतात..तर तबला संगत करतात ते साईनाथ घुरे्..
प्रकाशयोजनेची बाजु सांभाळली ती हेमेत कुलकर्णी यांनी..तर सुखदा भावे-दाबके यांनी पार्श्वसंगीत तयार केले आहे..सुबोध गुरूजींनी थोडक्यात पण कुठेही नेता येईल असा सुटसुटीत सेट तयार केला आहे..

नटाची वेदना आणि त्याची घालमेल व्यक्त होणारे हे स्वगत तुम्हा प्रकाशातल्या रंगमंचावर जरूर पहावे..


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

-        

No comments: