Friday, August 1, 2008

सांगलीकर कलावंतांनी आणली स्वरबहार

"सारेगमप'च्या फेरीत चमकलेल्या सांगलीच्या तीन शिलंदारांनी गेल्या रविवारी पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठी गीतांच्या भावविश्वात रसिकांना गुंतवून ठेवले.महेश मुतालिक, संगिता चितळे आणि अनुजा वर्तक या तीन गायकांनी "स्वप्न सुरांचे' हा कार्यक्रम सादर केला. चाळीशीनंतरच्या तारूण्यावस्थेतील हे कलावंत. स्वरांची पक्की बैठक आणि शब्दातल्या भावना पोचविण्याचे कसब त्यांच्या गाण्यातून स्पष्ट दिसत होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

झीच्या छोट्या पडद्यावर चमकलेले हे तीघे कलावंत सांगलीचे. आधी चमकले आणि मग दर्शकांनाही ओळखीचे झाले. आता स्वतंत्र कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपली गाणी गावोगावी पोहोचवताहेत. अभिजित कुलकर्णी यांनी निवेदकाच्या भुमिकेतून गाण्यांच्या शब्दांना आणि गायक कलावंतांही बोलते करत हा सूरांचा प्रवास शब्दांनीही समृध्द केला. गेली कांही शतके जे कवी ,गीतकार, संगीतकार आणि गायकांचा मराठी मनावर पगडा होता त्या सर्व गाण्यांनी हा कार्यक्रम उलगडत गेला.

गाण्याच्या सादरीकरणाला अधिक उठावदार करणारे वादकही तेवढेच आठवणीत राहतात .
तीन गायकांच्या गायन शैली वेगळ्या . गाण्याची निवडही वेगळी . तरीही इथे त्यांनी जो सांघिक परिणाम साधला तो थेट रसिकांच्या मनापर्यंत पोचला आणि त्यांचा संगीत प्रवासही उलगडत गेला.
वयाची चाळीशी पार केलेल्या या कलावंतांनी सादर केलेली ही स्वरमैफल "बहारदार' रंगली. नटली आणि स्मरणात उरली.

No comments: