Tuesday, August 10, 2010

ह्या पार्टीला कोण थांबविणार..
पुण्यात मध्यंतरी थेऊरला झालेल्या सिंबायोसिंच्या मुलांची पार्टी बरीच गाजली. व्यवस्थापन शाखेतल्या ५०० मुलांनी यात धिंगाणा घातला. पोलिसांनी तथाकथित कारवाई केली. मिडीयानेही या घटनेचा योग्य तो बोभाटा केला.
मात्र यामुळे पुण्याचे तथाकथित संस्कृति बिघडल्याचे चित्र कांहीनी रेखाटले.

या घटनेचा पाढा गिरवून यातून पुढे काय करायचे यासाठी पुण्याच्या अनुबंध संस्थेने परिसंवाद घेतला. यात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी बोलले.
मुंलींसह पार्टीत सहभागी झालेल्यांना आपण काही गुन्हा केला आहे असे वाटावे यासाठी त्यांचे संस्थेतून निलंबन करावे. तर यांच्या गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे यावर डॉ. माधवी वैद्य ठाम होत्या.
तर भाई वैद्य यांनी यानिमित्ताने आजच्या शिक्षणाच्या बाजारूपणावर टिका केली आणि ही मुले आपलीच आहे त्यांना कौन्सीलिंग करण्याची गरज आहे, असे मत मांडले.
दारूला चले जाव करण्याची आज काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
अंकुश काकडे यांनी तर पुण्याच्या संस्कृतिला यामुळे गालबोट लागल्याचे सांगत संस्थेने या मुलांना फारच शिक्षा कमी केल्याचे सांगून यातून काहीही साध्य हो
त नाही. शैक्षणिक संस्थांवर मुले शिक्षणानंतर काय करताता याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगीतले.


आजकालची मुले कुठे जातात याची पालकांनाही माहिती नसते. त्यांच्यावर अशा कृत्यावर पांघरूण घालण्यापेक्षा कांही शहरातल्या मान्यवरांनी एकत्र येवून मुलांना समजावून सांगण्याची गरज शांतीलाल सुरतवाला यांनी आपल्या भाषणातून मांडली.

कुमार सत्पर्षी यांनी जिथे शक्य असेल तिथे सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न केला तरच ह्यात सुधारणा होईल. सध्या ही नवश्रीमंतांचा वेगळी पिढी शिक्षण संस्थात धुमाकूळ घालत आहे. ते पैशाने शिक्षण विकत घेत आहेत. त्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांच्यावर इतर समाजाचे देणे आहे हे समजवण्याची गरज आहे.


या परिसंवादात पोलिसांनी मिडीयाला साथीला घेऊन कारवाई केल्याची टिका झाली. मात्र पोलिसांच्यावतीने येणारे वक्तेही गैरहजर होते.
आजच्या पिढी हुशार आहे. पण त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. पैशाने शिक्षण विकत घेता येते हे चांगले कळून चुकले आहे.
शिक्षण संस्था बाजार मांडून बसल्या आहेत. मॅनंजमेंट कोट्याची आणि एकूणच जो जास्त पैसे देईल त्यांला प्रवेश दिला जातो. इथे पदव्या विकत मिळतात अशा पाटीलावलेल्या शिक्षण संस्थांची वाढ थांबायला हवी.

कुणी कितीही म्हटले तरी हे असे चालायचे. तुम्ही आम्ही फक्त पहात बसायचे एवढेच.


सुभाष इनामदार, पुणे..


subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: