Friday, August 13, 2010

शाळेतली 'ती 'कविता..बोलते


आजकाल फारसे कुणी परंपरा पाळत नाहित. आम्ही मात्र त्या पाळतो. नव्हे परंपरेचे पाईक होण्याची पात्रता आमच्या सर्वांच्या अंगी यावी म्हणून त्यांचा धुमधडाक्यात ( आमच्या दृष्टीने बरसा) प्रसार करण्याचे ठरविण्यात आल्याचा खलिता ( अलिखित) काढण्यात आला आहे.

श्रावण लागला. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

ही कविता मिळाली. पण ती सध्या शाळेत मराठीच्या पुस्तकात नाही, हे वाचून खेद वाटला.


मग काय शोध घेताना सापडले की, रमणबागच्या शाळेतले संगीताचे शिक्षक ( तसे मास्तरच) अजय पराड ६,७वीच्या मुलांना कवितांना चाली लावून त्यांचेकडून गाऊन घेतात.

मग आमचा मोर्चा वळला. तो शाळेकडे.

एकी हेच बळ हे ब्रीद वाक्य असलेल्या शनिवारातल्या शाळेत पराड सरांशी बोलताना आपण तीन्ही वर्गात कोणती कविता आहे त्यांचे प्रात्याक्षिकच शूट करू, असा सल्ला दिला.


हिरवी छाया हिरवी माया

पानोपानी हिरवी किमया

ह्या ६वी ब तुकडीतील विद्यार्थी कसे अगदी लयीत, चालीत माना डोलावून कविता सादर करत होते.

ठरले तीच शूट करायची.

गेली काही वर्षे ही कविता रमणबागेतल्या अनेक मुलांना पाठ झाली आहे.


बालपणीच्या वर्गातल्या या कवितेची मजा काही औरच.

तिच या मुलांकडून म्हणून घेताना, तो निरागस चेहरा. शब्दाला संगीताची मिळालेली जोड सारेच काही
क्षणापूरते तरी तुमचे होते. तुम्हीही त्यात मिसळून जाता.

अगदी तसेच माझे झाले.

तुम्हालाही तोच आनंद देता येईल.


खरे म्हणजे तो आजच्या काळाला. परिस्थितीला पूरक आहे की नाही. हा विचार इथे नसतो.
जे आपण अनुभवले ते इतरांपर्यत पोचविणे हाच उद्देश असतो. अगदी साधा सरळ.

तोच मी केलाय.

यात काव्य पाठांतर आठवेल.

ते बरोबरचे मित्र आठवतील. तो दंगा स्मरेल.

पण एकदा त्या विश्र्वात तुम्ही जावून स्वतःला फ्रेश भासेल.

बस्स. हा एकच उद्देश.
ती शाळा. ते शिक्षक. सारेच.

हाच जुना काळ. भुतकाळ. रमाल काही काळ......


-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: