Monday, September 20, 2010

विंचूरकर वाडा जतन व्हायला हवा


एके काळी ज्या विंचूरकरवाड्याला गायकवाड वाड्याइतकेच महत्व होते. १८९४ साळी सरदार विंचूरकरांच्या या वाड्यातच लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणपती बसवला. यालाच एकेकाळी 'लॉ क्लासचा गणपती' म्हटले जायचे. आज हा वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता ह्या वाड्याचा काही भाग जतन केला जावा अशी मागणी केली जात आहे.

लोकमन्यांच्या केसरीचे पहिले कार्यालय या वाड्यात होते. आजही ते ज्या भूयाराखाली बसून अग्रलेख लिहीत तेही याच खोलीत पाहता येते.१९९२ मध्ये स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक याच वाड्यात दहा दिवस एकत्र राहत होते. आणि पहिला गणपती याच वाड्यात बसविला गेला.अशा तिनही ऐतिहासिक घटनेचा साक्षिदार असलेला हा सरदार विंचूरकरांचा वाडा आज विंचूरकरांचे नातेवाईक दाणी यांनी विकायला काढला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारकडे ह्या वाड्याच्या महत्वाबद्दल अनेक पत्रोत्तरे केली. जयंतराव टिळकांनीही हा वाडा पुरातन विभागाच्या ताब्यात यावा यासाठी प्रयत्न केले. पण सरकार कडून कोणतीही हालचाल झालेली नाही.
लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट,पुणे यांचे मार्फत गणपतीत दहा दिवस वाड्याचा तो ऐतिहासिक मजला गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या कामासाठी वापरला जातो.

खालच्या मजल्यावर बाळासाहेव भारदे यांचा सहकारी ग्रामोद्योग संघ आणि केसरीच्या त्या कार्यालयात महाराषट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे काम चालते.
या वाड्यातल्या गणेशोत्सवात एके काळी ह.भ. पांगारकर, प्रो. जिनतीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजीपंत खाडीलकर, चिंतामणराव वैद्य, वि.ग.भानू इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली आहेत. आजही इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. पण कुणाच्याही पैशाची अपेक्षा न करता.

या मूर्तीचे वेगळेपण आणि या वास्तूचे महत्व लक्षात घेता भाविकांनी आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी या वाड्याविषयीचे प्रेम कायम ठेऊन असा ऐतिहासिक ठेवा जपावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सुभाष इनमादार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: