मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मांडवात सत्यनारायणाची पूजा घातली जात आहे. तरी पाहणारे भक्तांची संख्या फारशा कमी झालेली नाही. एकच झाले. शनिवार रविवारच्या तुलनेत मात्र ही संख्या कमी आहे. आज दुपारी पडलेल्या पावसाच्या सरींनी गणेश मंडळांच्या मिरवणूकीच्या कामावर थोडा परिणाम जाणवेल. पण एके वर्षी गणेशोत्वसाच्या अखेरपर्यत वरूणराजा बरसत होता तरीही भक्तांचा सागर आटला नव्हता.
समजा बुधवारी पावसाने आपली हजेरी लावली तरी नाद सुरूच राहणार.. ढोल-ताशांचे फड वाजतच रहाणार... नागरीकांची पावले लक्ष्मी रस्त्याकडे वळणारच.
माती गणपती मंडळ नारायण पेठेत रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. रांगोळीतील रेखीवपणा आणि कल्पकता तुम्हीच अनुभवा.
माती गणपती मंडळाची मूर्ती शांत..तिथे कुठलाही भपका नाही. पुरेसा लाईट आणि भक्तिमय संगीताना वातावरणही बदलून जाते.
भारती विद्यापीठाच्या नवी पेठेतल्या चौकातल्या नागनाथ अचानक मित्र मंडळाने सादर केलेला पौराणिक देखावाही लक्ष वेधून घेणारा आहे.
शनिवारातल्या वीर हुनुमाच्या श्रीराम भक्तीची कथा हलत्या आणि भव्य अशा देखाव्यातून साकारली गेली आहे. यात राम भक्ती आणि राष्ट्रभक्ती यांचा मेळ घातला आहे.
वीर तालीम मंडळाची गणेश मूर्तीच्या हातात गदा आहे. तीही लक्ष वेधून घेते.
या उलट दही हंडीची धूम साकारली ती कर्वे रोडवरच्या पाडळे पॅलेसच्या चौकातल्या नागनाथ तरूण मंडळांच्या हलत्या देखाव्याने. मुंबईतल्या चाळीची आणि गोविंदा पथकाची एकत्रीत प्रतिकृतीतून सिध्द झाली... साकारली गेली ती दही हंडी.
पुणे शहरात अनेक कल्पक देखावे नटले आहेत. मात्र सारेच दाखविण्याचा अट्टाहास यावेळी केला नाही.
मात्र जे देखावे आणि सजावटी दाखविल्या त्या आवडल्या असाव्यात असा तर्क आहे.....
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment