Wednesday, September 22, 2010

पुणे गणेश विसर्जन सोहळा



सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या पुणे शहरात बुधवारी पुण्याचे पालक मंत्री, पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते मंडईतल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुण्याते ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची पुजा होऊन ठिक साडेदहाच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीला आरंभ झाला.


मंडई परिसरात एकत्रित आलेल्या तांबडी जोगेश्र्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीच्या गणपतीला अजित पवार आणि महापौरांनी मानाचा पुष्पहार अर्पण केला. पहिले चार गणपती लक्ष्मी रस्त्याने जाणार आहेत. तर टिळकांच्या केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणुक टिळक रस्त्याने जाणार आहे.


मंडईतून सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक दुपारी साडेबारपर्यत बेलबाग चौकापर्यत आलेली होती.

रांगोळीच्या पायघड्या घालून गणेश मंडलांचे स्वागत तर होत होतेच. पण यंदा विसर्जन मिरनणुकीत परदेशी विद्यार्थी, पर्यटक अधिक संख्येने दिसत आहेत.


उल्हास पवार, मोहन जोशी, गिरीश बापट, निलम गोरे, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, रोहित टिळक यांच्यासाह अनेक राजकीय नेते निरवणुकीत सामिल झालेले दिसतात. या उत्साहात महिलावर्गही बहुसंख्येने सहभागी झालेला दिसतो. नगारा बॅंड पथके आणि ढोल-ताशांच्य पथकांच्या तालावर अनेक जण या मिरवणुकीच्या आनंदात मिसळुन गेल्याचे चित्र दिसत आहे.

मानाच्या गणपतीच्या समोर गुलालाची उधळण होत नसल्याने बहुसंख्य नागरीकांनी संतोष व्यक्त केला. भक्तिमय वातावरणाने भारलेला लक्षमी रस्ता हा बुधवारी पुर्णपणे गणेशमय झालेला आहे.
यंदा विशेषतः गर्दीतही आपल्या मोबाईल कॅमेरात ह्या विसर्जन मिरवणुकीत क्षण टिपण्यासाठी सरसावलेले दिसतात.

यंदा स्वाईन फ्लू आणि जर्मन बेकरीच्या स्फोट या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.पोलिसांची विविध पथके कार्यरत असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


हळूहळू मिरवणूक पुढे सरकत जाईल तसा जोश आणि उत्साहाला अधिक भरती येईल. कितीही मानवनि्र्मित संकटे आली तरी भक्तिच्या या शक्तित कमतरता भासत नाही उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होतानाच जाणवत आहे.

यंदाचा गा गणेश विसर्जन सोहळा लवकर संपावा आशी अपेक्षा आहे. उद्या बाबरी मस्जीद खटल्याचा निकाल आहे यामुळे पोलिसांची वाढती कुमक पुण्यात दाखल झालेली आहे.

No comments: