Sunday, December 4, 2011

माझे `मी` पण


माझे जगणे कुणासाठी
स्वताः.च्या मनासाठी

माझे रुसणे कुणासाठी
माझ्यातल्या `मी`साठी

माझे अस्तित्व कुणासाठी
सत्य, सुंदर `त्या`साठी

माझे जीवन कुणासाठी
माझ्यावर प्रेम करणा-यांसाठी

माझे `मी` पण कुणासाठी
तुझ्यातल्या `त्या`साठी

आज प्रत्येक जण काही खास कारणाने सतत धडपड करत असतो..कारण काय?..कुणासाठी...मला सहज सुचलेल्या ह्या ओळी...पहा..तुमच्याही भावना कदाचित याच असतील...


subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276

1 comment:

Vishnu Gopal Vader said...

कविता वाचली. आवडलीही. कवितेतील भावना जरी तुमची वैयक्तिक असली तरी ती मला प्रातिनिधिकही वाटते... पण माझी एक तक्रार आहे. तक्रार कवितेबद्दल नाही, तर ती ‘निमित्त’ वर आल्याबद्दल. आपण एक कवितेचाच वेगळा, स्वतंत्र असा ब्लाँग का करत नाही? म्हणजे कविता सलग वाचायला मिळतील ना..