गिरीश कुलकर्णी उवाच्
अक्षराधार आयोजित माय मराठीच्या ४२१व्या ग्रमथप्रदर्शनाचा समारोप प्रसंगी वळ, गाभ्रिचा पाउस, विहिर आणि देऊळ चे लेखक आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी मुक्तसंवाद केला.त्यावेळी त्यांनी मांडलेले विचार..त्याच्याच शब्दात देंण्याचा हा प्रयत्न...
शालेय शिक्षणात साहित्याची आवड जोपासली गेली. साहित्य हा कलेचा गाभा आहे..तिथेच वाचनाचा छंद लागतो. प्रत्येकाने तो जोपासावा..नविन मराठी शाळा आणि नंतर न्य इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे इथेच तो ध्यास जडला.भेट या जी ए कुलकर्णी यांच्या पुस्तकाने ते शब्दांचे गारुड मनात भरुन सोडले.
वाचताना त्या पात्रांच्या ऐवजी मला माणसे दीसू लागतात..आणि शब्दांमधला आस दिसतो..तो जाणून घेण्याचा विचार चालू होतो... तिच सवय आजही आहे.
अजूनही बाबुजींची गाणी, जुने संगीत, जुने लेखक, जुन्या कविता, तेच जुने पुढारी, सारेच तेच तसेच चालत आहे आहे...त्यांचा ठसा आजही कायम आहे...पूर्वसूरींच्या जीवावर किती काळ जगणार...जरा स्वतःचे नवे तयार करा..
तुमचे गाणं, नवे लेखन, नव्या कविता...आजच्या तपरुणांना जे आपल्याला भावेत ते व्यक्त होणं आवश्यक आहे. याची नितांत गरज आहे.. माझा अन्वयार्थ मी लावणार,,,तसा मी लेखनात लावतो..देऊळमध्ये तेच केले आहे..माझ्या भावना व्यक्त केल्यात...
आज शहरात एकसुरीपणा वाढलाय...त्यात भावना, निसर्ग काहीच शिल्लक खेड्यात आजही माणसं आठवतात..दिसतात ती त्यांच्या निसर्गाच्या परिस्थितीसकट...तेच अधिक भावते.त्यांच्या व्यक्त होण्यात प्रांजळपणा, मोकळेपणा आहे. खरं जगणं. ती मंडळी जगताहेत.. मला ती अधिक जवळची वाटतात...आजही माझे मन मुंबईंच्या शहरी जीवनात रमत नाही...तिथे स्वतः हरविला जातो....काम आटोपून केव्हा एकदा पुण्यात येईन असे होते.
टीव्हीवर दिसणारे सारे कार्यक्रम मालिका टुकार आणि पांचट आहेत. टीआरपी मीळविणारे कार्यक्रम भुक्कड आहेत.
कृतिप्रवण होणे ही आज काळाची गरज आहे...पैशावर नातेसंबंध जपले जात आहेत..त्यात खोटेपणा आलाय...पैसा हाच प्रमाण बनलाय...
( हे अपूर्ण आहे...)
1 comment:
हा अपूर्ण लेख वाचला, आणि,असेनात का अनेक गैरसोयी, पण आपण खेडयात राहत आहोत, याचा माझा मलाच हेवा वाटू लागला. असो.
‘निमित्त’ मधले लेख मी मधून मधून वाचत असतो. माझ्यासारख्याचा त्यामुळे एक फायदा होतो आणि तो म्हणजे पुणे-परिसरातील साहित्यिक, सांस्कृतिक वगैरे विश्वातील घडामोडी कळतात, नव्हे, त्या कार्यक्रमांचा प्रत्यक्षानुभवच मिळतो. धन्यवाद!!
Post a Comment