Friday, February 1, 2013

कितीही आपले म्हटले ...
कितीही आपले म्हटले
सारे जण एकटेच असतो
ह्दयाचा संवाद म्हटला
ठोक्यातून वाजत असतो

जवळ असातानाही
दूरचा भास होतो
लपलेल्या श्वासातही
रोज अंधुकसा दिवा पेटतो

... मिटल्या डोळ्यांनी
जग पाहिता येते
स्वप्नातही ते मग
अधिक सुंदर भासते

दूरावा होतानाही
दूरवर जात नाही
जवळ भासला तरीही
अपला म्हणता येत नाही

-------------------------------------------------अचानक अवेळी....


अचानक अवेळी जाग आली..
भलताच नाद करत आली..
दचकून मीही जागा झालो..
थोडा विचार करु लागलो..

काय सांगू कसे झाले..
काळजाचे ठोकेही थोडे चक्रावले
फटकन् दिवा विझला
अंधार सर्वत्र पसरला.

 एक आकृती माझ्याशी बोलू लागली
मला घाबरुन भिती दाखवायला लागली..
रुपाचा तिला पत्ताच नव्हता
भाषेचा तर प्रश्नच नव्हता...

अक्राळ रुपाची साक्ष तेव्हा मला पटली
पुन्हा कधी दाटलेल्या अंधारात झोपच उडाली..
अठवते ते एवढेच..काही
पुढे त्याचा लवलेशही नाही...
 

 सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmial.com
mob.9552596276

No comments: