भरारी घेणा-या पिलाला कधी हाती झेलता येतं. पंख दिसतात..पिसं समोर येतात..पण उड्डाण थांबवता येत नाही.. आपल्यालाही पंख असते..भरारी घेतली असती..आणि सा-या पक्षांना एकत्र करुन ..मारली असती आकाश भरारी..
दिसणा-या त्या ता-यांना अधिक जवळ तरी पहाता आले असते.. येणा-या प्रत्येक कवडशाचे दार तरी किलकिले केले असते. भासणा-या चंद्रकोरीच्या भोवती फिरता आले असते.. चांदण्यांच्या प्रकाशात मनसोक्त भटकायला आले असते..
नादावलेल्या मनाला थोडा आवर घातला.. धिर देऊन थोडे शांत केले अधिरतेने मग पक्षांना स्वच्छंदी हिंडू दिले. उडणा-या पंखांत अधिक बळ यावे..यासाठी प्रार्थना केली..
No comments:
Post a Comment