Sunday, August 31, 2008

बाबूजींची गाणी आजही घालतात रुंजी!

ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या शेकडो गाण्यांतून काही निवडक गीतांच्या सादरीकरणाने रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातल्या रसिकांना तृप्त केले.
बाबूजींच्या चालींतला सोपेपणा, गीतातील स्पष्ट शब्दोच्चार आणि भावनेने भारलेले स्वर यातून उमटणारी गाणी येथे सादर झाली.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.


"तुझे गीत गाण्यासाठी' या नावातच सुरांची साथ अपेक्षित आहे.


"स्वरालय'च्या अभिजित आपटे यांनी हा कार्यक्रम सादर करताना तेवढीच प्रभावी साथीदारांची टीम उभी केल्याने गाण्यांना बहारलेपण आले होते. विशेषतः सचिन जांभेकरांचे संगीत संयोजन आणि त्यांचेच हार्मोनिअम शब्दांना झेलीत आणि स्वरांना कुरवाळीत गायकांना साथसंगत करीत होते.
ंहृषिकेश रानडे, प्रमोद रानडे आणि विभावरी आपटे-जोशी यांनी तेवढ्याच सुरेलपणाने ती गायली. रवींद्र साठेंचे भारदस्त स्वर बाबूजींच्या चालीला न्याय देताना कलावंताचा प्रभाव दाखवितात.
विशेष उल्लेख करायला हवा तो उत्तरा केळकर यांचा.
लावणी, भावगीत, प्रेमगीत आणि देशभक्तिपर गीतांतून त्यांनी रसिकांची पावती टाळ्या आणि वन्स-मोअरने मिळविली.
चित्रपटगीत, भावगीत, अभंग, लावणी, देशभक्तिपर गीत अणि सुगम संगीतातून कार्यक्रम बहरत गेला. विशेष म्हणजे गीतरामायणाची अजरामर गीतेही आळवली गेली.
विक्रम भट (तबला), पद्‌माकर गुजर (ढोलकी), नितीन जाधव (साईड रिदम) आणि की-बोर्डवर होते जितेंद्र कुलकर्णी.

अरुण नूलकरांच्या निवेदनाने बाबूजींच्या सुवर्णकाळाची ओळख होत होती.

No comments: