पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळासमोर गुरुवारी पहाटे वीसहजार महिलांनी सामुदायीक अथर्वशीर्षाचे पठण करून ऋषीपंचमीच्या दिवशी भारतीय हिंदूसंस्कृतीचे जागरण करुन एक सामाजिक उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव हा वीस वर्षे सुरु असलेला उपक्रम होईल की नाही याची शंका होती.
पण पुण्यातल्या हिंदू संघटना, गणेश भक्त, मंडळाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांच्या सहकार्याने उपक्रमाची ही २१ वर्षाची परंपरा अविरत सुरु राहिली.
सौ.शुभांगी अरुण भालेराव, अरूण भालेराव यांनी अर्थवशीर्षाचे आयोजन केले होते.
चार भागात केलेल्या व्हिडीओतून संपूर्ण अथर्वशीर्ष ऐकता व पहाता येईल.
भाग पहिल्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.....
पुण्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी पारंपारिक पोषाख करुन ,नटून-थटून या पठणात आपला सक्रिय सहभाग घेतला.
ऍना स्टीफर (स्विझर्लंड) आणि ब्रॅंड लूना (अर्जेंटिना) या दोन परदेशी महिलांनी नऊवारीच्या भारतीय पारंपारिक वेशात या पठणात सहभागी झाल्या होत्या.
मंडपापासून दृष्टी पोचेपर्यंत सगळ्या भागात महिलांनी रस्त्यावर आपला छाप टाकला होता.
दगडूशेठ गणपती पुणेकरांचे मानाचे पान. अथर्वशीर्षाच्या पठणामुळे सारा परिसर भक्तिमय वातावरणाने भारुन गेला होता.
हा अनुभव शब्दात सांगण्यपेक्षा तो प्रत्यक्ष अनुभवणे हेच योग्य होईल.
पहाटे साडेसहाला सुरु झालेला हा कार्यक्रम दीड अतिशय शिस्तबध्द पध्दतीने महिलांच्या उत्साहात रंगत गेला.
भावीकता, श्रध्दा अणि संस्कृतीचे दर्शन देणारा हा सोहळा गणेशाच्या आरतीने संपन्न झाला.
गृहमंत्री शिवराज पाटील यांची कन्या, खासदार रजनी पाटील आणि राज्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी व्यासपीठावर खास उपस्थित होत्या.
मंडळाचे मुख्य विश्वस्त तात्या गोडसे यांनी ही महिलांच्या अथर्वशीर्षाची
परंपरा कायम जोपासली जाईल अणि हा गणेशोत्सव अधिक लोकाभिमुख होईल अशी आशा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment