Friday, August 20, 2010

वेबकॅमवर आले संगीताचे वर्ग




काळ बदलला हेच खरे. नाती बदलली. संदेश यंत्रणा बदलली. संपर्क साधनात नवे तंत्र विकसित झाले. शिक्षणाची पध्दत बदलली. पाठ्यपुस्तके बदलली. संस्कृतिशी जोडलेली नाळ मात्र कायम राहिली. प्रचार आणि प्रसार माध्यमांच्या बदलत्या परिस्थितीत. इंटरनेटचा वापर वाढला. हाताने लिहण्याचे कामही कमी झाले. आता संगणकावरची बटने संदेशवाहक बनले.

या इंटरनेटच्या सुविधेमुळे आणि त्यांतल्या webCam च्या वाढत्या प्रचाराचे तंत्र उपलब्ध झाले.

या तंत्राचा फायदा घेऊन परंपरेने चालत अलेली गुरू-शिष्याची ही नाती बदलली. विद्या मिळविण्यासाठी गुरुच्या घरी राहूनच ती प्राप्त करता येत होती. पण पुढे गुरू शिष्याकडे शिकवणीसाठी जावू लागला. हूळूहळू गुरूने चांगली जागा घेऊन शिक्षणाच्या दालनाचे व्यवसायात रुपांतर केले. क्लास आले. आता त्याच्यापुढे जावून. घरी बसून शिक्षणा घेता येईल अशी सोय झाली. वाहिन्यांनी क्लासरुम सुरु केले. आता तर कुठे न जाता On Line शिक्षणाचा मार्ग मोकळा झालाय.


आता नमन पुरे. तर विषय होता शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत शिक्षण शिकविण्याचा मार्ग ON LINE च्या जाळ्यातून स्विकारला गेला. आज अनेक गुरू आपल्या विद्दयार्थ्यींना या पध्दतीने शिक्षण देतानाची संख्या वाढत चालली आहे.

on line education and online payment

आमचे तरूण मित्र . राहूल देशपांडे यांच्या नविन कट्यारमध्ये सदाशिवाची भूमिका करणारे कलावंत महेश काळे यांनी आपला उच्च शिक्षणात पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून अमेरिकेत नोकरी न करता संगीत शिक्षणाचा प्रचार करायचे धोरण आखले. आज त्यांचेकडे १००-१५० मुले ( काही आपल्या भारतीय घरातली तर काही परदेशातलीही) North Indian Classical Music शिकण्यासाठी येत आहेत.


जेव्हा ते अमेरिकेत असतात तेव्हा ते आपल्या San Francisco Bay Area तल्या घरात गुरू-शिष्य त-हेने म्हणजे समोर बसून शिकवितात. पण कुठे मैफलीला किंवा कार्यक्रमाला गेले तर बरोबरच्या Laptop ला इंटरनेट क्नेक्ट केला की WebCam वरून मुलांना अगदी घरी बसून शिकवावे असे शिकवीताना मी पाहिले आहे.

संगीत शिकण्याची इच्छा असणारे हे तरूण त्यांच्या अमेरिकेतल्या घरी ठरलेल्या वेळी जमतात. मात्र काळे त्यांचा क्लास या इंटरनेटच्या माध्यमातून वेळेवर घेतात. ती वेळ आणि तो दिवस ते वाया जावू देत नाहीत.


कट्यारच्या तालमींच्या आणि प्रयोगांचे वेली ते भारतात होते तेव्हाही विद्यार्थ्यांची वेळ आणि दिवस चुकला नाही.

संगीताच्या प्रसाराला या अधुनिक साधनांचा उपयोग करून केवळ एका विभागापुरती म्रर्यादित असणारी साधना आता जगभर यामुळेच तर विखुरली गेली आहे. भारतीय कलांचा, त्यां पारंपारिक बंदीशीचा प्रसार आता अंतराच्या अडचणी ओलांडून केव्हाच देशांतराला गेल्या आहेत.


कला प्रांतात होणारा हा बदल स्वागतार्ह तर आहेच पण आता भारतीय भाषा, संस्कृतीची दालने तुम्हाला जगात कुठेही उघडी आहेत. तुमची केवळ इच्छा हवी, इतकेच.


काळ बदलला. तंत्र बदलेल्याने विकासाची दिशा तेवढीच रुंदावते हेच यातून सिध्द होते. नाही काय?



सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com

9552596276

No comments: