Saturday, September 18, 2010

पावले चालली पहाया गणराया...


शुक्रवार संध्याकाळपासून सारी पावले श्रींमंत दगडूशेठ मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दाटी वाटीने पडत होती. दुतर्फा चकाकणा-या दिव्याची आरास. आप्पा बळवंत चौकाकडून तर कुणी रविवार पेठेतून श्रींचे दर्शन आणि मंडळाने उभारलेल्या भाग्योदय राजमहालाची रोषणाई पाहण्यासाठी उत्सुक असणारा. पुणे महापालिकेकडून येणारे भावीक पायी हळूहळू चाला या न्यायाने शनिवारवाड्याकडून कुटुंब काबीला घेऊन जलद चालताना दिसत होते.


आधिच बुधवार पेठेकडे येणारी वाहने बंद करण्यात आली होती. पोलिसांचा फौज फाटा सुरशक्षेच्या पूर्ण तयारीत आपली कामगिरी करत होतेच पण अनिरूध्द बापूंचे तिनशे स्वयंसेवक गर्दीला आवरण्यासाठी संध्याकाळी ६ ते ११ या वेळात गेले कांही दिवस हजेरी लावत आहेत. अशा स्वयंसेवकांचे विविध ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेसाठी सेवा करत आहेत.


बुधवार पेठेतल्या फरासखाना पोलिस ठाण्यापासूनच एकेरी चालण्यासाठी भक्तांना वाट करून देत होते. या गर्दीतही रस्त्याच्या कडेला विविध वस्तू, खेळणी, फुगे विकणा-यांची ही दाटी. मधुनच पोलिस त्यांना हटकत होते. बाजूच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर खवय्यांची गर्दीही भरमसाठ.एकूणच शुक्रवारपासून मंगळवार पर्यत दगडूशेठ गणपती पाहणांरांचे प्रमाण वाढणार आहे.
मांगल्यांची ही मंगलमूर्ती आणि तिला आकर्षक रोषणाईच्या वातावरणात पाहण्यासाठी साराच भक्तिमय वर्ग गर्दी खेचत आहे.


सश्रध्द भावीकांची ही दाटी या काळातही इतक्या संख्येने येतात. ही आश्चर्याची गोष्ट.

भक्तिचे हे रूप

दावी तू गणेशा

आलो मी दर्शना

भाविकतेनेसुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: