Tuesday, September 14, 2010

पुण्याचे गणपती महाराष्ट्राला खुणावतोय


पुण्यातल्या मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना ढोल-गजरांच्या तालावर गणेश चतुर्थींच्या दिवशी झाल्यानंतर विविध सजावटींनी आपली रोषणाई आता खुली करून भाविकांना गणेशाची मोहक रूपे पाहण्यासाठी आकर्षीत केली जात आहेत. उत्साही गणेश मंडळांचा आकर्षक सजावटही मन मोहून टाकत आहे.
यातच एखाद्या मंडळाचा अगदी साधा गणपतीही लक्ष वेधत आहे.

गणेशोत्सवाची धूम पुण्यात सध्या सुरू आहे. जल्लोषाबरोबरच धार्मीकताही जपण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. पूर्वी जसे सामाजिक उपक्रम .यावेळी केले जात. आज ती संख्या कमी असली तरी समाज भावीक बनत चालला आहे. त्याचा उत्साह कमी झाला नाही हे नक्की.

यंदा गणेशोत्सव १२ दिवस चालणार आहे. मंगळवारी घरच्या गौरी येत आहेत . त्या जेवणार आहेत बुधवारी. गुरूवारी गौरी बरोबर घरच्या ब-याचशा गणपतींचे विसर्जन होईल. त्यानंतर मात्र खरू धूम सुरू होईल. सार्वजनिक देखावे पाहण्यासाठी रस्ते वाहू लागतील.

वर्षातल्या या गणेशोत्सवाची वाट पहाणारे अनेक जण मुद्दाम पुण्यात येतात. साथीच्या आजाराने यंदा पुन्हा डोकेवर काढल्याने थोडा परिणाम जाणवेल असे वाटले होते. पण आजच रस्ते बहरून गेल्याने हा वाहतूकीचा आणि सुरक्षेचा ताण पोलिस यंत्रणेवर पडणार आहे.

एकूणच श्रगणेशाची ही धूम आणखी आठ दिवस तरी चालूच रहाणार आहे.


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


No comments: