Tuesday, September 14, 2010
आली गौरी सोन्याच्या पावली
गौरी आगमनाचा आजचा दिवस महिलांच्या खास आनंदाचा.
श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर गौरींचे आगमन होते. घरात आनंदाचे वातावरण नांदू लागते.
आजकाल कुटुंबे दूरदूर गेली. दुरावा वाढलाय. पण या सण-उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारा.
माहेराला जाण्याचे हे पारंपारिक निमित्त. कोकणात तर हा सण मोठ्या दणक्यात साजरा होता. आपल्या प्राचिन परंपरा जपून तिथ त्या सांभाळल्या ,पाळल्या जातात.
आनेक नाती एकत्र येतात. सुखाचा , मायेचा शिडकवा मिळतो. माहेरवाशिण आपल्या आई-वडीलांच्या घरी माहेरपणाला येते.
थोडी चिंता बाजू ठेऊन सारे जण हा आनंदाचा ठेवा साठवत , गाणी म्हणत नाती सांधतात.
विविध ठिकाणच्या प्रथेप्रमाणे गौरींचे आगमन होते. कुठे खड्याच्या. कुणाकडे उभ्या हाताच्या. तर कुणाघरी उभ्याच पण मुखवटच्या गौरींचे आगमन होते. कुणी मुखवटे दरवर्षी नविन आणतात. तर काहीजणांकडे पितळ्याचे कायमचे मुखवटे बसवून गौर सजविली जाते.
घराला उत्साह देणारे हे वातावरण गौरीमुळे अधिक जाणवते. गौर म्हणजे महालक्ष्मी . त्यांची गाणी म्हटली जातात.
आठवणींच्या कुपीत साठलेली गाठोडी सोडून मनेही मोकळी होतात.
अखेरीस या सा-या सण-उत्साहाचे सार एकत्र येण्यातच आहे. दूरावलेली नाती दृढ होतात. आजकाल विभक्त कुटुंबामुळे दूर गेलेला संवादाचा झरा पुन्हा पाझरतो.
इथे प्रत्येक घर आपापल्या ऐपतीप्रमाणे उत्सव साजरा करतो. संस्कृतीवर घाला घालणा-या संस्कृतीरक्षकांनी तोंडात बोटे घालावीत असा हा उत्साहाचा सोहळा गुण्यागोविंदाने नांदत आहे. कुणाच्याही वक्र दृष्टीला भीक न घालता गणपती बाप्पाचा गजर करीत सारे लोक आनंद घेत आहेत. तुम्हीही तो घ्यावा. आणि इतरांनाही तो द्यावा हिच इच्छा.
सुभाष इनामदार,पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment