Thursday, October 18, 2012

संतोष दास्ताने..अकाली गेला.भारावलेल्या जड अंतःकरणाने थोडा विसावलो होतो. हे कधीतरी होणारच होते..फक्त ते इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते.आज मात्र घडले. दुःखद घटना खरच किती अनपेक्षित येतात. एकदम कोसळतात. न सांगता..चाहूल न देता...अनपेक्षित..

आमचा प्रकाशन क्षेत्रातला अभ्यासू मित्र संतोष दास्ताने..अकाली गेला..काही दिवसापासून आता हा व्यवसाय त्याने कमी करायला सुरवात केली होती. पण तो इतक्या लवकर जाईल याची कधीही त्याच्या चेह-यावर खूणही दिसली नाही...

दास्ताने रामचंद्र आणि कंपनीचा तो संचालक..मालक..

महाराष्ट्र नावाचे एक पुस्तक गेली कांही वर्षे तो काढत होता..प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्यातल्या सांस्कृतिक, राजकीय, समाजकारणातील ..तसेच आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणारे हे वार्षिक...आपल्या परिने तो ते सातत्याने प्रकाशित करायचा...
महाराष्ट्र राज्याबद्दल सर्व काही माहिती देणारा वार्षिक संदर्भग्रंथ.  अद्ययावत माहिती व आकेडीवारी, त्याचप्रमाणे नकाशे, आकृत्या इत्यादींचा समावेश यात होता..

प्रकाशकांनी एकत्र येऊन..व्यावसायात असणा-या अडचणींसाठी आणि एकमेकांच्या चांगल्या गोष्टींची स्तुती करण्य़ासाठी तरी का होईना एक व्हावे अशा इच्छेने धडपडणार हा प्रकाशक..आज त्याचे सारे संकल्प त्याच्याबरोबरच संपल्यासारखे झाले..आता तोच गेला..आपण फक्त श्रध्दांजलीसाठी चार शब्द लिहू शकतो..बाकी काय...


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: