एखादा चित्रपट
येण्याआगोदर काही दिवस त्याची जाहिरात येऊन धडकते. तशी या श्री पार्टनर बाबत परवा
झाले. १९७७ साली आलेल्या वपुंच्या ( बापूंच्या) कादंबरीने
मध्यमवर्गीय जीवनातील सुख-दुखाःच्या
प्रसंगातून एकलेपण घालविणा-या आणि मित्राचे नाते , त्याचे प्रेम जपणा-या या जीवनाचे विलक्षण शब्दात
केलेले हे शब्दचित्र डोळ्यासमोर ऊभे रहाते. याच नावाचे नाटक आले. त्याचे १००
प्रयोग झाले. त्यात वपुंनीच पार्टनर ची भूमिका केली होती.
नंतर आली ती मालिका. त्यात विक्रम गोखले यांनी
पार्टनर रंगविला. आणि आता समीर रमेश सुर्वे तीन वर्षांच्या अथक् धडपडीनंतर याच
कादंबरीतून चित्रपट तयार करून तो रसिक-वाचकांसमोर आणत आहेत. गेल्या दीड वर्षात
त्याच्या धाडसाला आणि ध्येयाला बाबा काळे सहनिर्माते म्हणून प्रप्त झाले आणि ही श्री
पार्टनरची फिल्म पडद्यावर साकार झाली.
आता मार्केटिंग तंत्र बदलेले आहे. गावागावात जावून
आधी त्याबाबात पत्रकार परिषद कलाकारांसोबत केली जाते. विविध माध्यमाचे
प्रतिनिधींसमोर त्यातल्या कांही गोष्टींची चर्चा होते. त्यातली वैशिष्ठ्ये मांडली
जातात. त्याचे गुणगान होते...मात्र एकदा चित्रपट लागल्यावर पुढे सारेच विरुन जाते.
कारण तो चित्रपट त्या ताकदीचा नसतो.
मात्र पार्टनर बाबत पाहिलेला आणि ट्रेलर मधून
दिसणारा आणि गाण्यांची रंगत आणि त्याचे चित्रिकरण पाहता तो कादंबरीसारखा नव्हे तर
वाचकांच्या मनात कादंबरी वाचताना ती जशी भावेल असा चित्रपट असावा याची खात्री
पटते..कारण तो काळ आता नाही हे नक्की पण संवादाचे आणि त्या परिस्थीतीचे भान
लेखकाला आणि पटकथा लिहिताना समिर सुर्वे यांना असावे असे दिसते.
इथे कुठलाही चेहरा फारसा ओळखीचा नाही. कारण
विविध शहरात जाऊन कलाकारांच्या मुलाखतीमधून ही कलावंताची फौज उभी राहिली आहे.त्यात
नवखेपणा असेल पण पण जिवंतपणा नक्कीच दिसेल.
पार्टनरची भूमिका सतीश पुळेकर या अतिशय कसदार
अभिनय करणा-या वेगळ्या धाटणीने आपली करियर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्याने केली आहे.
आईच्या भुमिकेसाठी लालान सारंग ह्या ब-याच काळाने चित्रपटात ठसा उमटवित आहे...मात्र
श्री (पद्मनाथ विंड) पासून त्याच्या पत्नि आणि प्रेयसीच्या भूमिकेसाठी (श्वेता
पगार) या नविन चेह-याची ओळख रसिकांना होणार आहे.
चित्रपट करायला होकार देणा-या बापूंच्या कन्य़ा
स्वाती चांदोरकरांनी चित्रपटाबाबत अतिशय चांगले मत व्यक्त केले आहे. आज बापू असते
तर त्यांनाही तो आवडला असता, असे त्यांच्या तोंडून येते. त्या चित्रपटाच्या प्रचारासाठी गावोगावी जातात.
चित्रपट करण्याआधी १४ वेळा परत परत यावर विचार
करुन त्याचे स्क्रिप्ट समीरने पुन्हा पुन्हा लिहले. विविध लोकांना विचारुन हा विषय
कसा रुचेल यासाठी त्याचा सर्व्हेही केला.
यातले संगीत हा एक महात्वाची भुमिका वठवतोय.
अश्विनी शेंडे यांच्या गीतांना निलेश मोहरीर या संगीतकाराने चित्रपटात ते विश्व
उभे केले आहे. त्यात मधुरता तर आहेच पण भारतीय परंपरेचे विशेषतः शास्त्रीय संगीतातल्या
रागांवर आधारित गाणी वेगळी वाटतात.
आता २४ ला पाहूया या श्री पार्टनरला रसिक कसे
स्विकारतात ते.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
1 comment:
https://www.facebook.com/vapurjhaa
http://vapurzaa.blogspot.in/
Post a Comment