Sunday, October 14, 2012

आयुष्याचा हा खेळ






एकेक पाय-या वर जायचे
नव्या विचारांची भर यायची
असलेल्या दिशा प्रकाशमान व्हायच्या
ज्ञानात भर पडायची..
आयुष्याचा हा खेळ असाच सुरु रहाणार
अखेरपर्यंत शिकत जाणे
स्वतःला घडवत इतरांना घडवित रहाणे...








दिशा मात्र स्वच्छ हवी
आरसा जसा बिलोरी
रोज नवे टिपण
नवे कांही नोंदण्य़ासाठी..


वय वाढते तसे खरचं आयुष्य कमी होतं..?
रुची वाढते तसं जीवनही उंचावतं...
समृध्द आयुष्यात आणखी काय हवं..?
दिलेस तेवढे खूप आहे..आत कसा मी तृप्त आहे..



सुभाष इनामदार,पुणे

No comments: