Friday, June 6, 2008

तुझा विसर न व्हावा- किर्तन परंपरेचा जागर

बालगंधर्व रंगमंदिरात नाटके होतात, लावण्यांचे कार्यक्रम रंगतात तशी आज बुधवारी रंगली कीर्तनाची जुगलंबंदी. तीही पिता-पुत्रांची.
मिलींदबुवा बडवे आणि श्रेयसबुवा बडवे यांनी कीर्तनाचा आनंद भाविकांनी भरभरून दिला. हाऊसफुल्लचा बोर्डही झळकला.


जुगलबंदीची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.


योगिराज महाराज दंडवते हे गाणगापूर मठाचे मठाधिपती या कीर्तनाच्या जुगलबंदीच्या दीडशेव्या कार्यक्रमाला आशिर्वाद देण्यासाठी आले होते.
नारदीय परंपरेचे हे कीर्तन बडवे पिता-पुत्रांनी आजच्या काळाचे दाखले देऊन रंजक केले. वयाच्या सातव्या वर्षापासून मिलिंदबुवा बडवे यांनी कीर्तनाची दिक्षा मुलाला दिली. आज मुलासोबत पहिल्यांदाच बालगंधर्वात उभे राहताना झालेला सार्थ अभिमान बोलूनही व्यक्त केला.

No comments: