आशिया खंडातल्या आठ देशांच्या रंगकर्मींचा महोत्सव लंडनच्या स्टॅटफोर्डच्या थिएटरमध्ये १३ जूनपासून सुरू होत आहे. यात पुण्याच्या "फ्लेम' संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून प्रसाद वनारसेंनी बसविलेल्या "दंगलनामा' या नाटकाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
इंदिरा गांधींची हत्या, सुवर्ण मदिगातील कारवाई, १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटानंतर उसळलेली दंगल यातून जातीय दंगली होऊन जो विध्वंस घडला,
त्याचे हे रंगमंचीय सादरीकरण.
याविषयी बोलताना वनारसे यांनी, संयम आणि अहिंसा याकडे आज पुन्हा नव्याने पाहण्याची वेळ आली आहे, असे सूचित केले.
No comments:
Post a Comment