"मराठी नाटक - नाटककार ः काळ आणि कर्तृत्व' या त्रिखंडात्मक ग्रंथांच्या प्रकाशन समारंभात प्रभाकर पणशीकरांनी हे विधान केले.
या कार्यक्रमाची ही ध्वनिचित्रफित.
पणशीकर म्हणाले, ""नट हाच नाटकाला संजीवनी देत असतो. नाटककाराचे शब्द नट रक्तात मिसळून घेत असतो. नटाचा आपल्या भूमिकेविषयीचा विचार काय आहे, ती भूमिका त्याला कशी सापडली, त्यालाच का मिळाली, या अनुभवांचे लेखन नटाने केले पाहिजे. नाटक म्हणजे शेवटी माणूस वाचणे असते. मानवी संबंध, विचार, विकार यांचे संबंध नाटकांतून प्रकट होत असतात.
मनोगतात डॉ. देशपांडे म्हणाले, सुमारे ४०० नाटके आणि चार हजार प्रयोग पाहून नाटकाचे साहित्य आणि प्रयोग म्हणून मूल्य काय, याची चिकित्सा करण्याचा प्रयत्न या लेखनातून केला आहे.'' माझे हे लेखन म्हणजे नाट्यवाङ्मयाचा इतिहास नाही, असेही त्यांनी सांगितले.
""नाटकांकडे केवळ मनोरंजन करणारे म्हणून न पाहता त्याचा साहित्यिक दृष्टिकोनातून अभ्यास झाला पाहिजे. गेल्या काही वर्षांत नाटकांविषयी जे लिहिले जाते त्याला मी "समीक्षा' म्हणणार नाही. नाटकावर नटांनी, दिग्दर्शकांनी लिहिले पाहिजे आणि तसा प्रयत्न मी एक नट म्हणून सुरू केला आहे. देशपांडे यांनी आता अन्य भारतीय भाषांतील नाटकांचाही अभ्यास करून लेखक करावे, अशी अपेक्षा विक्रम गोखले यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment