"शब्दमेघ' या युवा कलावंतांनी पावसाच्या कवितांचा कार्यक्रमही सुदर्शन रंगमंचावर आजच साकारला. "झिम्मड' या पावसाच्या कवितांना नाट्यमय रूपात त्यांनी साकारले.
स्वानंद बर्वे, श्रीकांत भिडे, मुग्धाली जातेगावकर, प्राची मते, अनुजा कोल्हटकर यांनी त्यांना रंगमंचावर सादरीकरण केले. याची संकल्पना,संकलन आणि दिग्दर्शक होते स्वानंद बर्वे .
याचा व्हिडाओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
आला पाऊस पुण्यात
नागरही खुश झाले
ओल्या मातीच्या गंधाने
तृप्त माझे मन झाले
झाले कुंद हवा इथे
झाले आकाशही काळे
निळ्या नभी ग जाहली
काळ्या ढगांचीही दाटी
ऊर भरून गेला आता
मन माझे चिंब झाले
पहिल्या या पावसाने
न्हाली धरणीच सारी
No comments:
Post a Comment