Saturday, February 25, 2012

आयुष्याच्या गाठी


आयुष्याच्या दोरीच्या गाठी
असतात बळकट
सुटताना घालतात गुंता
सहजी सुटत नाही अशा...

सारी स्वप्ने आधुरी ठेऊन
अचानक विचार न करता
सारेच इथे ठेऊन
एकटेपणीच निघून जातात...

घर उदासवाणे भासणारे
व्यक्तिच्या खुणा जपणारे
भावनांचा आवेग
विसरता न येणारे ...

आठवणींचे बांध फुटतात
उमाळा दाटतो
सारा काळ डोळ्यासमोर येतो
भुतकाळात रमत जातो..

होणारे टाळता येत नाही
समेवर दाद मिळत नाही
कधी संपेल गाणे
सांगता येत नाही...

म्हणून म्हणतो जागा रहा
आल्या घडीचे स्वागत करा
विसरू शकणारे सारे सोडून द्या
उद्यासाठी आशा मात्र जपत रहा...



subhash inamdar,Pune


subhashinamdar@gmail.com

No comments: