Monday, February 27, 2012

सुखी आहे ती तरीही...


माझी मराठी घराघरात नांदते
सुखी आहे ती तरीही...
डोळे वेगळेच सांगते..

कौतुकाने जरी सारे माना डोलाविती
जनात जाता ते सारे विसरी.
जगात कीर्ती मात्र महान
सुखी आहे ती तरीही...

ज्ञान, कर्म, धर्म, संस्कृती
सारी परंपरा जुनी
पुस्तकाला त्या कधी
उलगडून पाहिली..
सुखी आहे ती तरीही...

छातीवर घेऊनी हात
अभिमानी सांगे त्याची महती
केवळ शब्दात जोर महान
सुखी आहे ती तरीही...

न्यायी, कायदी त्याचेच राज्य
केवळ सारे जुने मसौदे
विनंती करतो अर्जी तुम्हा
उगळा गा अभिमान
सुखी आहे ती तरीही..

ज्ञानी, ज्ञानवंता जपते
संस्काराचे ओझे वाहते
परि राज्यकर्ती नसे तिज मान
सुखी आहे ती तरीही...

जागा भारत..देश महान
महाराष्ट्राचा सार्थ अभिमान
कुणास ठावे किती झळके
यापुढे तिचा सन्मान.
सुखी आहे ती तरीही...


सुभाष इनामदार, पुणे
(मराठी दिनानिमित्त..)
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: