
उंच बांधा, भव्य कपाळ
भाळी शोभे कुंकवाचा साज
चेहरा उभा, ओठ नाजूक
अंगी शिरशिरी, रुप साजिरे
डोळे धारदार, नाक चाफेकळी
बोलण्यातली हास्याची झालरी..
बोटात कला, येई बाहेरा
बोलण्यात साधा भास
अंगात शिस्त बाणेदार...
तशी चारचौघींसारखी, पण तेवढीच उजळ
सोज्वळता अंगी, वाणीत हेलकावे...
रुपाचा तोरा, केसाचा तोरा
पाठीवर ऱुळे शेपटाचा पिसारा..
नजरेत बाणा, कणखर पणा..
अंगी असे बहुत साधेपणा..
सतत भासतो गंभीरपणा
जवळ येताच दिसे बाणेदारपणा..
खळखळून हसणे
नजाकत फसवी
नाना रुपात साठे अन्य देहबोली..
मनाचा तळ, ह्दयीचा उमाळा
कसा शोधू जाणा
अंतरीचा...
आकाशात तारकापुंज
स्पष्ट दिसे रवि-शुक्र संग
साठवून ठेवी रुप हेच माझ्या चित्ती
व्हावी दिगंत कीर्ति जगभरी.....
सुभाष इनामदार, पुणे
No comments:
Post a Comment