Wednesday, February 22, 2012

नेसली निळी पैठणी-सीड़ीचे प्रकाशन



लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांच्या हस्ते आणि नामवंत संगीय संयोजक इनॉक डॅनियल यांच्या उपस्थितीत `सप्तक` म्युझिकच्या वतीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण आणि घरंदाज लावण्यांची `अनुपमा चंद्रात्रेय `यांच्या आवाजातली डॉ. ज्योती ढमढेरे यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या, तर अनुपम चंद्रात्रेय यांनी गायलेल्या 'नेसली निळी पैठणी' या. सीड़ीचे प्रकाशन...२१ फेब्रुवारी. २०१२.टिळक स्मारक मंदिर,पुणे

निळ्या पैठणीत नटून अमेरिकेत स्थायीक झालेल्या अनुपमा चंद्रात्रे (पूर्वाश्रमीची पुण्याची अनुपमा ढमढेरे) हिने आपल्या आईने रचलेल्या लावण्यांची सीडी सुलोचनाबाईंच्या हस्ते मंगळवारी, २१ ला पुण्यात प्रकाशित केली. अतिशय उत्साही वातावरणात दादही तेवढीच दिलखुलास मिळाली.

इनॉक डॅनीयल यांनी परदेशात राहून भारतीय संस्कृती जपणा-या अनुपामाचे विशेष कोतुक केले. सुलोचनाबाईंनी तर संगीतकार वसंत पवार यांच्यामुळे आज आपण जे काही आहोत त्याचे श्रेय त्यांना दिले..अगदी डोळ्यात पाणी आणून त्यांनी वसंत पवारांच्या आठवणीने स्वतःला आणि श्रोत्यांना गलबलून सोडले. आपण एकवेळ परमेश्वराला आठवणार नाही.मात्र वसंत पवारांना आठवणार नाही असा दिवस जात नाही... त्यांनी आपल्याला लावणी शिकविली...घडविली..
मला लावणी गायिका म्हणून उभे केले ते संगीतकार वसंत पवार यांनी. 'नावगाव कशाला पुसता, मी हाये कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची' ही त्यांनी दिलेली पहिली लावणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांच्यामुळे मिळालेल्या यशाची चटणी-भाकरी आम्ही अजूनही खात आहेत, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी येथे काढले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. ढमढेरे यांच्याच सुलोचनाबाई म्हणाल्या, की पुण्याशी माझा जुना बंध आहे आणि इथल्या लोकांची पसंती मिळाल्याशिवाय कलाकाराचे नाव होत नाही, असेही त्यांनी संगितले.

मोघे म्हणाले, की लावणी ही 'परफॉर्मिंग पोएट्री' आहे. त्याची प्रचीती 'नेसली निळी पैठणी' या सीडीत येते.

या निमित्ताने लावण्यांचे पुस्तकही 'अटकर बांधा' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना सौ. ज्योती ढमढेरे यांनी लावण्याविषयीचे आपेल मतही नोंदविले. `लावणी ही लावण्यपूर्ण, शृगांरिक, समर्पित भावनेनी नटलेली. मनाला उल्हसित करणारी. सकारात्मक दृष्टीकोन देणारी काव्यरचना आहे.शृंगार हा तिचा आत्मा आहे. ती कधीही अश्लील, बिभत्स होता कामा नये. लावणी ही उपशाश्त्रीय व लोकसंगीताच्या बांधावर उभी असेलेली सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे. इतर संगीताच्या मानाने लावणी उष्ण प्रकृतीची आहे.`

No comments: