Tuesday, February 4, 2020

चतुरंग मधून अवतरले चार महान संगीतकारमृदुला दाढे-जोशी यांचा महत्वाचा वाटा


सी रामचंद्र. मदन मोहन. ओ. पी.नय्यर. रोशन.. या चार महान संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या अजरामर गीतांचा आस्वाद देता देता ती गाणी का इतकी वर्षे रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य का गाजवून आहेत याचा साक्षात्कार देणारा  चतुरंग हा संगीतमय कार्यक्रम आजही आपले वेगळेपण मनात कायम ठेवून आहे.. रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अनुभवलेले साडेतीन तास लिहिताना डोळ्यात साठवून राहिले याचे प्रमुख कारण मृदुला दाढे- जोशी यांनी चार संगीतकारांच्या गाण्यांची केलेली बुद्धिनिष्ठ  विचार मांडणी.. कार्यक्रम संगीताचा ..पण लक्षात रहातो मृदुला दाढे -जोशी यांनी त्याविषयी सांगितलेली मर्मस्थाने आणि संगीतकारांनीही केला नसेल असा त्यामागे ठेवलेला विचार.शरयू दाते, सई टेंभेकर आणि संदीप उबाळे यांनी त्या गाण्यांना  सादर करून जी मौज रसिकांना  आपल्या गायनातून अनुभवायला दिली त्याबद्दल हमलोगचे सुनील देशपांडे यांना मनापासून दाद देणे हे गरजेचे आहे.. चतुरंग.. खरेच चार संगीतकारांवरचा कार्यक्रम पण तो पेलला तो तीन गायक आणि एक अभ्यासपूर्ण भाष्य केलेल्या मृदुला दाढे-जोशी या चार कलावंतांनी..  तो चोखंदळ आणि विचक्षण वाचक तसेच जाणकार श्रोते असलेल्या पुणेकरांना तिकीट काढून  तो मनापासून ऐकवासा वाटला यातच याचे यशस्वीपण सामावलेले आहे.

 त्या संगीतकारांच्या सुवर्णकाळात जेंव्हा मेलडी ही अनभिषिक्त सम्राट होती. चाली छान होत्या. गाणं सुरेल होते. शब्दात ताकद होती. हे सारे मान्य केले तरीही त्यात विलक्षण दैवी गुण होता. त्या भारावलेल्या अवस्थेतून बाहेर आलो की त्यातली सौन्दर्यस्थळे  नव्याने जाणवायला लागतात..या गाण्यांचा एक संगीत अभ्यासक म्हणून मृदुला दाढे यांनी याविषयी केलेले भाष्य  त्या चालीविषयी वेगळी दृष्टी देतात . मग ते गीत रसिकांसमोर गायक गायिका सादर करतात..यातूनच संगीतकारांची त्यामागच्या विचारांची दिशा कळण्यास मदत होते आणि आपण भारावून जातो.
प्रत्येक संगीतकाराचा स्वभाव आणि त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्यांच्या चालीतही आढळते असे मृदुला दाढे यांना वाटते आणि ते त्या सोदाहरण मांडतातही.
रोशन यांचा शास्त्रीय संगीतावर विलक्षण प्रेम..त्यांची गाणीही त्यातल्या बंदीशीसारखी ..मन रे तू काहे ना धीर धरे ..संदीप उबाळे यांच्या आवाजात ते दर्द भरे गीत मोहिनी घालते.
काळजात  किनारी दुःख आणि रांगडी मस्ती असणारा संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचा उल्लेख होतो.. त्यांचे  बलमा बडा नादान हे गीत शरयू दाते तेवढ्याच सुरेलतेने गाऊन रसिकांना मोहित करतात.

मदन मोहन हे नाव उच्चारताना काळजात कळ येते..अक्षय कारुण्याचा झरा म्हणजे मदन मोहन..दुःख आणि तेही भरजरी
अनुभवावे ते या संगीतकाराच्या गाण्यातून.. हम प्यार मे  जलनेवलो.. या गण्यातून सईने  ते नेमके स्वरातून उलगडून दाखविले.

ओ. पी.नय्यर यांच्या गाण्यात तुम्हाला ते  भावनेला थेट भिडवतात.  तीव्र भाव, जिद्द, रांगडेपणा सारे त्यांनी आणि आशा भोसले यांनी त्या गाण्यात जपले..त्यांचेच  एलो मै हारी पिया.. हे गीता दत्त यांच्या अवजातले गाणे सईने सादर करीत ते दर्शन घडविले..

असे चार संगीतकांचे सांगेतीक दर्शन चतुरंगच्या मंचावर सतत उलगडत जात होते.. कधी स्वरातून तर कधी शब्दातून ते सारे संगीतकार वेगवेगळ्या भावनातून इथे सिद्ध होतात.. मग ती गाणी कधी बंदीशींवर आधारित तर कधी उत्तम रचनेतून कानी येतात..

लग जा गले.. इशारो इशारोमे..अकेली हूँ मै...तुम आगर मुझको ना चाहो..असेल नाहीतर.. तुम क्या जानो..आप के हसीन रुख पे..ओ चांद जहाँ.. चैन से  हमको कभी..
सारीच हिंदी चित्रपटसृष्टीला आपले चार चांद लावणारे हे चार संगीतकार ऐकताना आपण स्वतःला भाग्यवान समजतो..ये जिंदगी उसिकी है. जो किसिका हो गया..या गाण्यातून जेंव्हा मृदला दाढे-जोशी समारोपाचे गीत सादर करतात तेंव्हा वतावरणही भारून जाते.. आण्णा म्हणजे सी. रामचंद्र यांच्या या  विलक्षण गाण्याने चतुरंगने अलविदा केले..

हम लोग प्रस्तुत या कार्यक्रमाची सारी भिस्त संगीत संयोजक आणि सिंथवर आपले प्रभुत्व असलेला कलावंत केदार परांजपे यांचेकडे जाते.. प्रसाद गोंदकर-सतार..निलेश देशपांडे-बासरी..  विशाल थेलकर..गीटार..
अजय अत्रे..विक्रम भट..दोघेही रिदम मशीन आणि तबला..यांच्या उत्तम संगीत साथीने हा प्रवास आनंददायी ठरला.. चालीला योग्य असा स्वरांचा भरणा ..गाण्यातील  शब्दांच्या अवकाशात संगीत संयोजकाने आकाराला आणलेली वाद्यांची सुरावट आणि तालातून बहरत गेलेली आनंददायी साथ..सारेच या वादकांनी आपल्या साथीतून रसिकांसमोर पेश केले.

असा कार्यक्रम करणे हे धाडस आहे ते सुनील देशपांडे यांनी ह्या हमलोग संस्थेने केले याबद्दल त्यांचेही आभार मानले पाहिजेत.  रंग चार सांगितकारांचे हा या कार्यक्रमाचा भाग पहिला आहे. म्हणून पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.-सुभाष इनामदार, पुणे


Subhashinamdar@gmail. com

1 comment:

Unknown said...

मृदुला दाढे ओशी यांच्याबद्दल आपण खूप छान लीहीले आहे. ते नुसते वाचून आम्ही त्या कार्यक्रमास मुकलो याचा मोठा खेद होतो.आपले व सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.
त्याच दिवशी कोथरुड संगीत महोत्सवात मात्र आम्हालाही शास्त्रीय संगीताची छान मेजवानी मिळाली, हेही नसे थोडके.