श्रीराम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून गेली पन्नास वर्षे गायन-वादनाचे शिक्षण देणाऱ्या या संगीत गुरूचे नाव आहे कमलाकर जोशी.लहानपणापासून दृष्टी गेलेल्या या जिद्दी गुरूची ही गोष्ट.वयाची ७१ वर्षे झाली.आजही डोळसांना लाजविल असा आत्मविश्वास बाळगून ते संगीत कलेत अनेक शिष्य पारंगत करीत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या प्रभात फेरीतल्या राष्ट्रजागृतीच्या गीतांची प्रंरणा घेवून त्यांची ओढ गायनकलेकडे झुकली.बहिणीच्या मदतीने आणि माता-पित्यांच्या छत्राखाली संगीताच्या प्राथमिक शिक्षणाला सुरवात केली.नाशिकला खरवंडीकरबुवांच्या सहवासात आले अणि त्यांच्या संगीत केलेचा विस्तार झाला.दृष्टी नसूनही गायन-वादनाची साथ भवितव्य घडविणारी ठरली. श्रीराम संगीत विद्यावलयाची मुहूर्तमेढ रोवली गेली.नाशिक सोडून पुण्यात आले ते संगीत क्लासचा वारसा घेऊनच.
दोन मुलींना संगीत कलेत प्रवीण केले.तबला,व्हायोलिन,सतार या वाद्यांचीही शिकवणी सुरू झाली.संसार झाला तोही या संगीत कलेच्या जोरावरच.
त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर रोटरीने त्यांना दहा हजारांचा चिराग पुरस्कार पं.जसराज यांच्या हस्ते गुरूवारी ३ एप्रिलला पुण्यात दिला.
त्यांच्या कार्याची ही ओळख......
चिराग पुरस्कार सोहळा. असा रंगला.....
No comments:
Post a Comment