शाम भुतकर. नाटकाचा नेपथ्यकार, वेशभुषाकार, प्रकाश आणि रंगभुषाही केलेला हरहुन्नरी कलाकार. चित्रपटाचा कलादिग्दर्शक म्हणूनही नाव कमावले. अनेक कल्पनांचा अविष्कार साकारला. कधी मनाजोगता तर कधी मेड टू ऑर्डर . शिवाय म्यूरल आर्टिस्ट म्हणूनही वेगळी ओळख झाली.
त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनावर आधारित ही ध्वनिचित्रफित...
तीस वर्षाच्या कालावधीनंतर "स्वमधला कलावंत जागा झाला. पाच वर्षाच्या कालावधीनंतर मुंबईच्या जहांगीरआर्ट गॅलरीची दारे उघडली. आणि शामची बोटांना , कपड्यांना रंगाचा आनंददायी स्पर्श झाला. १२ ते १७ ंमेच्या प्रदर्शनासाठी रंगमंचाच्या पोकळीत तयार झालेल्या छाया-प्रकाशाच्या खेळाची आंदोलने मनात नाचत पुढे येऊ लागली. गेल्या दीड-दोन महिन्यात बोटांना कल्पनेची साद लाभली. आणि साकारली प्रदर्शनातली चित्रमय गॅलरी.
पुण्यात शाम भुतकरांनी याच चित्रांने प्रदर्शन भरवले. चित्रकार, कलावंत आणि शिल्पकारांची ,चाहत्यांची शाबासकी मिळाली. आता तो मुंबईच्या कलादालनात स्वतःला साकारायला सिध्द झाला आहे.
थोडे मागे वळून पाहताना कलावंत कसा घडला ते कळते. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचे तर....
माझा निर्मिर्तीच्या संदर्भातला प्रवास हा अवकाशाच्या पोकळीला स्वतःचा अर्थ,रंग,आकार देताना चालूच आहे. अगदी वयाच्या आठव्या वर्षापासून मला सभोवतालचा परिसर ,माणसं. आजूबाजुचा निसर्ग यांच्यासंदर्भात पाहण्याची दृष्टी रंग आणि आकारांच्या ओढीतूनच निर्माण झाली.
अवकाशातील विस्तिर्ण सांजवेळ आणि मध्यरात्रही अनुभवली. त्यातल्या रंग-सावलीच्या खेळाने मन माझे वेडावून गेले.
त्यातूनच आकाशातले आकार, कवडसे चित्रातून कॅनव्हॉसवर प्रकटले.....
त्याच्या या रंगाच्या प्रवासाची आणि निर्मितीमधल्या काही अविष्काराचे आपणही साक्षीदार व्हावे यासाठी शाम भुतकरांच्या शब्दामधून साकारलेली ध्वनीचित्रफित सादर करीत आहोत. त्याच्या दृष्टीने आहे हा नाट्यमय चित्रानुभव !
No comments:
Post a Comment