Tuesday, June 14, 2011

झाकोळलेले आभाळ


झाकोळलेले आभाळ
दुरावलेला प्रकाश
उदास मन
थबकलेली कोकिला
कुंद वातावरण
एक दिवस
असाही ......
-----------------------

नवी नेसून दुलाई
आली वर्षा गे दारी
तिच्या स्वागता उघडू
दारे पुरती सावरू
.....
ओली राने, ओली धरणी
ओले रस्ते ,ओले नाले
तहानलेल्या बालकाला
तृप्त कराले गे देवते
-------------------------
सारी सुखे येतात
नाही
आणली जातात
आणि मग तीच
तुमची गरज बनत जाते

1 comment:

प्रमोद देव said...

नवी नेसून दुलाई
आली वर्षा गे दारी
तिच्या स्वागता उघडू
दारे पुरती सावरू

नवी नेसून दुलाई की दुलई?

ह्या चारोळीत एक बदल सुचवू इच्छितो...
दारे पुरती सावरू...काहीच बोध होत नाहीये . त्याऐवजी...
तिच्या स्वागता उघडू
दारे मनाची सताड.... हे कसं वाटतंय?

बाकी चारोळ्या छान जमलेत.