Wednesday, September 7, 2011
घर..मंगलमूर्तीचे..उत्सवाचे...
गेले काही दिवस तो मंगलमय स्वरूप घेऊन दाखल झाला. आरूढ झाला. घरातल्या मुख्य दिवाणखान्यात. रोज ओवाळून घेऊन मंगलकामना करीत आम्ही त्याची आरती केली. त्या मंगलमय मूर्तीच्या पार्थीव मूर्तीला प्रतिष्टीत केले. सकाळ-संध्याकाळ मूर्तीपूजनाची तयारी होत होती.
नैवेद्याने मूर्तीमय घर बहरून गेले. त्याच्या जोडीला आम्हीच सारे एका मोहरलेल्या धार्मिक वातावरणात होतो. घरात गोड-धोड होत होते. कधी उकडीचे मोदक तर कधी पुरणाची पोळी. रोज वेगळा नैवैद्य दाखवून त्याची यथासांग पूजा सारेच कुटंबीय करीत होतो.
आमच्या प्रथेप्रमाणे गौरीबरोबर विसर्जन होऊन सातव्या दिवशी या मंगलमय पार्थिव मूर्तींचे विसर्जन केले.
हे झाले प्रथेप्रमाणे...
पण यंदा पावसाने म्हणजेच.. निसर्गाने कमाल दाखविली. आमच्या समोरच्या सा-या परिसरात याच मंगलमूर्तींच्या वास्तव्याच्या काळात पावसाने जोर केला.पालिकेच्या म्हणा किंवा राजकीय लोभातून, गेली तीन-चार वर्ष ज्या रस्त्याचे शुक्लकाष्ठ सुरू आहे. त्या रस्त्याचे काम पूर्णच काय अपूर्ण राहून गेले आहे. त्याचा पहिला धक्का सा-या नागरिकांना बसला. घरात पाणी शिरले. प्रतिष्ठापना केलेल्या मंगल गणेशाचे उच्चाटन करून कुणी इतरांच्या घरात तर कुणी शहरातल्या नातेवाईकांचाय घरात घेऊन गेले.
खरं म्हटले तर एकदा बसलेल्या मूर्तीला हलवायचे नसेत. इथे तर स्वतःचा जीव- जीच वस्तू जायची वेळ तर तरीही मंगलमूर्तींना सोबत घेऊन हे सारे भाविक डळमळीत होऊन गेले.
कालच ब-याच घरातले गणेश नदीत. तलावात किंवा पालिकेने बांधलेल्य़ा चौकोनी टाक्यात विसावले आहे. पुढल्या वर्षी परत येण्यासाठी..
संकष्टी पावावे..म्हणून प्रार्थना करणा-या गणरायाला ही आपत्ती निवारण करायची बुध्दी का नाही झाली ... राज्यात सर्वत्रच पावसाने धुमाकूळ घातला. रस्ते जलमय झाले. नद्या, धरणे भरून वाहू लागले. निसर्गिक आपत्तीतही न डगमगता सारा डोलारा पुन्हा सुरू झाला...
एकीकडे लोकांच्या घरात पाणी. उद्याची चिंता असताना बाकीजण आनंदाचा उत्सव साजरे करून आनंदात न्हाऊन निघाले. कुणी आपल्या आरोग्याच्या काळजीत आहेत. तर कांहीना हा त्रास वाटून हा उत्सव संपण्याची वाट पहात बसलेत..
लाखोंची उधळण होत असताना..जुनीच कामे पुन्हा काढून त्यातून मलीदा कसा खाता येईल याच्या दिशेने झटताहेत.. उत्सवाची दोन रूपे..मंगलमूर्ती..तुझ्याच दारात बसलीत.. ह्यांना न्याय कधी देणार रे बाबा...
जलमय अशा वातावरणाची भिती मनात ठेऊन..आमच्या परिसरात रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार यांच्या चिंतेत बसलाय.
आता दोन दिवसांवर रविवारी सार्वजनिक गणेशांचे विसर्जन होईल. पुण्यात त्यासाठी भाविकांनी रस्ते भारून जातील.
तुडुंब गर्दीत सारे रस्ते गुलालाच्या ,ढोल-ताशा आणि स्पीकरच्या भिंतीनी छातीत धडकी भरणारे आवाज घुमू लागतील.
आपली दुखेः विसरून उत्सवात न्हाऊन निघालेल्या भक्तीला तू गणेश देवा.. प्रतिसाद दे.. मंगलमय कर.....
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
I liked this article and your feelings whicha are though representative... but unique!!
Post a Comment