Monday, February 6, 2012

हूरहूर...



आधी हूरहूर येणा-या क्षणांची..
लपलेल्या त्या अवकाशात दडलेल्या हळुवार स्पंदनासारखी..
संथ चाललेले नादही मग गोंगाट भासू लागतात..
इतर वेळी सहजपणे जाणारी वेळही मग सेकंदाची गणिती ठोके ऐकवीतात..
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तीचे रुप वेगवेगळे..
कधी आतूरता
कधी दाहकाता
कधी धूसरता
कधी स्वप्नही...
प्रत्येकाच्या नजरेत तिची किमया आगळी..
रुपात ती कधीच साठत नाही..
चंचल, चपळ तरीही हवीहवीशी..
शैशवापासून वृध्दत्वापर्य़ंत सतत तुमच्या बरोबर
तुमच्या श्वासासारखी..
जी सतत फसवते
मात्र ती टाळता येत नाही..
ती लागते मात्र तिची आसही तेवढीच
जी दिसत नाही पण असते..
अस्तित्व नसले तरी भासते ते मनात.
कधी झोपेतही...
रोजच्या व्यवहारात..प्रत्येक क्षणी...




सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: