
डोळ्यात पाहिले ते विसरु शकत नाही
स्वप्नी अनुभवले ते सांगू शकत नाही
मनात दोघांच्या भावना एकच होती..
साठवले काय ते सांगू शकत नाही
ओढ भेटीची आज तीव्र होती
चेह-यावरची गाली अधीक स्पष्ट होती
अंतर असले तरी डोळे साठवत होते
व्यक्त होत नव्हत्या तरी भावना तीच होती
स्पर्शात उब होती..शरीर सांगत होते
मन मात्र ते सारे लांबूवच निरखत होते
मनाची भावना शब्द सांगत होता
शरीर मात्र तेव्हाही आक्रसलेलेच होते
नागमोडी वळणांची कसरत आजही
प्रेमाची जाणीव प्रखर आजही
उद्याची पहाट आपली खात्रीही आजला
स्मरता त्या भेटीला पहाट साक्षीला..
सुभाष इनामदार, पुणे
1 comment:
अप्रतिम !!
Post a Comment