Tuesday, July 3, 2018

माणसांत राहून माणूस शोधूया



कोण आपला, कोण परका
ओळखायचे कसे
वरून तर दिसतो सारखा
आतले काहीच कळत नाही

स्वभाव, गुण आणि बोलणे
सारेच स्वतंत्र असते
 एकमेकांचे नाते तसेही
अनोळखेच भासते

मनात असलेले सारे
तो ओठावर आणत नसतो
खोलवर रुजलेली वेदना
तो थोडाच सांगत असतो

खरं तर आपण आपल्याला
कधीचे शोधत असतो
विसरलेले सारे नकळत
मनावर कोरत जाते

विश्वास तेव्हा आपल्यावरही
बसत नाही
इतकेही तुमचे तुम्हालाही
उमगत नाही

करूया शोध
आपला आपणच
जग काय म्हणेल
कशाला विचार करूया

अंगात आहे धमक
बळ आहे शरीरात
थोडे बेफिकीर बनुया
आयुष्य सारे झोकून देऊया


जवळचे सारे जातील दूर
आपणच आपले विसरतील गीत
माणसांत राहून माणूस बनुया
आयुष्याच्या टप्प्यावर 
आपणच आपणास शोधूया


(हे मुक्तक आहे)





-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com






No comments: