श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली शिक्षण संस्थेने बाल कलाकारांच्या गायनाने पुण्यात कुश-लव रामायण गातीचा आविष्कार सादर करून पुणेकरांची शाबासकी मिळविली.
या गीतरामायणाची झलक ऐकण्यासाठी ईथे क्लिक करा....
आंतर्नाद ही बाल कलाकारांच्या सुप्तगुणांना व्यासपीठ देणारी संस्था.संस्थेच्या विविध शाळातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन ह्या कार्यक्रमासाठी बाल गायकांची निवड केली गेली.माजी आणि आजी विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीतरामायण स्वर-तालाने मंत्रमुग्ध करणारे होते.
प्रा. अशोकराव घारपूरे यांच्या प्रेरणेतून आणि तुषार आपटे यांच्या मार्गदर्शनातून गीत रामायणाचा हा तेजस्वी आविष्कार सिद्ध झाला.माधव आणि आशा खाडिलकरांनी मुलांना मार्गदर्शन केले.त्यातून घडलेले हे गीतरामायण मुलांच्या सांगीेतिक कौशल्याची प्रचिती देतात.
अमृता जोशीच्या निवेदनाने रामायणपर्व उलगडत जाते.सायली जोशी,सुकृत ताम्हणकर,छोटी गायीका शिरीन केळकर,श्रीरंग जोशी,अभिषेक काळे,स्वराली अभ्यंकर,आर्या खाडिलकर,यशश्री जोशी स्वप्नावी कुलकर्णी या विद्यार्थी गायक-गायीकांनी स्वराला परिश्रमाची जोड देऊन सुधीर फडके-ग.दि.मांच्या गीतांना भावभावनांनी समृद्ध करून शब्दांना तालीच्या बांधेसूद परिमाणात तोलून पुन्हा त्या गीतरामायणाची आठवण करून दिली.वाद्यवृंदातली विद्यार्थीवर्गच होता.संवादिनी-स्वानंद कुलकर्णी,आणि तबला-परेश पेठे यांचा उल्लेख करायलाच हवा.मुलांच्या आंतर्नादला साद दिलेल्या सांगलीच्या संस्थेचे खरच कौतूक करायला हवे.
पुण्यतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातल्या प्रयोगाला दाद देण्यसाठी पु.ना. गाडगीळचे मालक दाजीकाका गाडगीळ आणि चेकमेट या मराठी चित्रपटाचे संगीतकार चंद्रशेखर महामुनी हजर होते.दोघांनीही मुलांच्या कलेला मनापासून दाद दिली.
No comments:
Post a Comment