पुण्यतल्या कथ्थक नृत्यात करियर करण्याची जिद्द बाळगणाऱ्या शर्वरी जेमीनिस यांना यंदाचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बीसमील्ला खॉंन यांच्या नावाने दिला जाणारा "युवा पुरस्कार" जाहिर झाला आहे. याच महिन्याच्या २९ तारखेला दिल्लीत तो समारंभपूर्वक दिला जाईल. यानिमित्ताने त्यांचेशी संवाद साधला.
त्याचा काही भाग आपण इथे व्हीडीओतून ऐकू शकता.
चित्रपटाच्या ऑफर येऊनही नृत्याला अधिक प्राधान्य देऊन त्यातच करियर करायची जिद्द बाळगून सिरियलसह चित्रपटाला नकार दिला गेला.
आजच्या कार्पोरेट जगतात कथ्थक नृत्याला वेगळे स्थान देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नवे मार्ग शोधून पारंपारिक नृत्याला दर्जेदार करणे हाच शर्वरी जेमिनीस यांचा ध्यास राहणार आहे.
शास्त्रीय संगीताच्या पारंरारिक पठडीत राहूनही कथ्थकला विविध प्रकारे सादर करण्याचा ध्यास त्यांच्यात आहे.
लहानपणापासून नृत्यकलेची साधना करून आता कुठे याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असल्यामुळे आपल्यावर आता आधिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांच्याशी बोलण्यातून आली.
कथ्थक नृत्यासाठी महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळतोय म्हणून वेगळी जबाबदारी आपल्यावर आहे. ती प्रेरणा अपल्याला भाग्यवान ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
चित्रपटाला आवश्यक असणारे सारे गुण अंगी असूनही शर्वरीने सारे लक्ष्य कथ्थकवर केंद्रित करायचे ठरविले आहे.
केलेल्या भूमिकात समाधान मिळाले मात्र नृत्याचा रियाज आणि सातारा,बीडसह लावण्यांना गर्दीकरणाऱ्या रसिकांना कथ्थकमध्ये असणारी भावना पोचविणे आपल्याला अधिक प्रेरणामय वाटत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
शर्वरीच्या या पुरस्काराने पुण्याला आणि आपल्या गुरू रोहिणी भाटे यांचाही सन्मान झाला आहे.
कृष्ण-राधेच्या पारंपारिक रचनातल्या त्या भावना युनिव्हर्सल आहेत मात्र काळाप्रमाणे त्यात कांही बदल करून रसिकांना आनंद देणारी रचना गावोगावी सादर करणे याचा ध्यास मला अधिक मोलाचा वाटतो,अशी भावना शर्वरीच्या संवादातून व्यक्त झाली.
No comments:
Post a Comment