मराठीत शिक्षण घेऊन मानाने समाजातल्या दोन भिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ.अनिल अवचट आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी मराठी अभ्यास मंडळात मराठी शिक्षण घेऊनही जीवनात कसे समृध्दपण आले. याची केलेली चर्चा मराठी भाषीकांना स्फूर्तीदायक ठरली.
होय ,आम्ही मराठीत शिकलो....
महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनिल अवचट आणि अच्युत गोडबोले यांच्या अनुभवातून मराठीत शिक्षण घेतल्याने आपला फायदा काय झाला ? याविषयीचे अनुभव मराठी अभ्यास मंडळात सांगीतले गेले.
त्यांच्या शब्दातच ते ऐका...
ज्ञानाची भाषा आज इंग्रजी आहे. ती यायलाच हवी. पण संस्कृतीची ओळख आणि भाषेची संपन्नता अनुभवण्याठी मराठीतूनच शिक्षण घेण्याची ठाम भुमिका मांडली. अकरावी नंतरचे तात्रिक ज्ञान मात्र परकीय भाषेत असल्याची खंत व्यक्त करून अच्युत गोडबोले यांनी संगणकाची तांत्रीक भाषा मराठीत देण्यासाठी आपण तीन पुस्तके लिहली असल्याचे सांगीतले. चवथे पुस्तक लवकरच येत असल्याची माहिती दिली. मात्र इतर लेखन मात्र मराठीतच करण्याचा आपला निर्धार पुन्हा जाहिर केला.
आजचा तरूण वर्ग पैशाच्या मागे लागला असून त्याला जगण्यासाठी अधुनिक सुविधा लागतात. मराठी मातीचा गंध तो वर्ग विसरत चालल्याची खंत त्यांच्या बोलण्यात व्यक्त झाली.
मराठी अभ्यास मंडळाच्या कार्याची माहिती करून देताना प्र.ना परांजपे यांनी मराठी शाळेतही उत्तम इंग्रजी शिकविण्यासाठी सरकारने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.. पुण्या-मंबईसह अनेक शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याबद्दल खेदही प्रकट केला.
No comments:
Post a Comment