समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना आणि निराधार गरजू मुलांना एकत्रित छत्र देणाऱ्या "आपलं घर'च्या डोणजे येथील नवीन पुनर्वसन प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले.३० मुले आणि १० वृद्धांना आधार देणाऱ्या या प्रकल्पाचे उद्घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले.
या प्रकल्पाची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील गोळेवाडीतल्या ४४ गुंठ्यांत हा पसारा उभा राहिला आहे तो स्व. वैभव फळणीकर मेमोरियल फौंडेशनचे संचालक विजय फळणीकर यांच्या मार्गदर्शनातून. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय समाजातल्या देणगीदारांच्या भक्कम पायावर ही वास्तू उभी राहिली आहे. वारजे परिसरात मुलांचे "आपलं घर' यापूर्वीच सुरू झाले आहे. आता हा या फौंडेशनचा दुसरा प्रकल्प. येथे पैसे असूनही निराधार असलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र अशा छोट्या खोल्या उभ्या केल्या गेल्या आहेत. त्या देणगीदारांच्या मदतीवर साकारण्यात आल्या आहेत. आम्हाला समाजासाठी काही करायचे आहे, पण निःस्वार्थीपणाने काम करणाऱ्या संस्था आज नाहीत, असा शेरा मारून काही देणगीदारांनी फळणीकरांच्या या कार्याला मदतीचा हात दिल्याची भावना व्यक्त केली.
निराधार वृद्धांना केवळ पाचशे, तर आधार हवा असलेल्यांकडून तीन हजार रुपये घेऊन त्यांची येथे सोय केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव शरद फडणीस यांनी दिली. समाजात आज आशा वृद्धाश्रमांची गरज वाढत असल्याचे विजय फळणीकर सांगतात.
1 comment:
Tha's really great work .
Post a Comment